श्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 17:00 IST2018-04-14T11:30:14+5:302018-04-14T17:00:14+5:30

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर सध्या तिच्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच खुशीने अतिशय स्टायलिश फोटोशूट ...

Sridevi's little girl made glamorous photoshoot, see photo! | श्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

श्रीदेवी यांच्या लहान मुलीने केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

वंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर सध्या तिच्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच खुशीने अतिशय स्टायलिश फोटोशूट केले. ज्यामध्ये तिच्या ग्लॅमरस अंदाज थक्क करणारा आहे. १७ वर्षीय जान्हवीने फोटोशूटप्रसंगी फाल्गुनी आणि शॅने पिकॉक यांनी डिझाइन केलेला thigh-high slit गाउन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच स्टनिंग अंदाजात बघावयास मिळत होती. खुशीने तिचे हे फोटो पोस्ट केले नसून, सेलिब्रिटी स्टायलिस्ट तान्या घावरी हिने शेअर केले. 





तान्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये खुशी कधी मेकअप करताना दिसत आहे, तर कधी पोज देताना दिसत आहे. दरम्यान, खुशीची मोठी बहीण जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘धडक’ या बॉलिवूड डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र खुशीला चित्रपटांपासून दूरच राहायचे आहे. रिपोर्टनुसार खुशीला अभिनयात अजिबातच रस नसून, तिला मॉडलिंगमध्ये करिअर करायचे आहे. त्यादृष्टीनेच ती एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे. 





दरम्यान, खुशी आणि जान्हवी दोघीही ‘मॉम’ श्रीदेवीला खूप कनेक्ट होत्या. त्यांच्या निधनामुळे आता या दोघींनाच इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. ज्यापद्धतीने खुशी आणि जान्हवी यांनी दु:ख विसरून स्वत:ला सावरले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. जान्हवीने तर आईच्या निधनाच्या काही दिवसांनंतरच शूटिंगला सुरुवात केली. जान्हवीच्या या धाडसाचे इंडस्ट्रीत सर्वांनीच कौतुक केले. 

Web Title: Sridevi's little girl made glamorous photoshoot, see photo!