मराठी अभिनेत्रीचा नवरा झळकणार 'शेरशाह' सिनेमात, एकेकाळी काजोलच्या फिऑन्सेची केली होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 12:50 IST2019-05-03T12:49:17+5:302019-05-03T12:50:21+5:30

'शेरशाह' चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून कारगील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. यात कारगील वॉरमधील हिरो विक्रम बत्रा यांची कथा सांगण्यात येणार आहे.

Sonali Khare's husband Bijay Anand will be seen in Shershah | मराठी अभिनेत्रीचा नवरा झळकणार 'शेरशाह' सिनेमात, एकेकाळी काजोलच्या फिऑन्सेची केली होती भूमिका

मराठी अभिनेत्रीचा नवरा झळकणार 'शेरशाह' सिनेमात, एकेकाळी काजोलच्या फिऑन्सेची केली होती भूमिका


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली खरे हिचा नवरा बिजय आनंद एकेकाळी बॉलिवूडमधील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. मधल्या काळात त्याने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्याने तब्बल सोळा वर्षांनंतर पुन्हा मालिकेतून कमबॅक केले आणि मालिकेतून पुन्हा करियरला सुरूवात केली. आता बिजय आनंद सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत शेरशाह चित्रपटात दिसणार आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे.


बिजय आनंदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर म्हटले की, धर्मा मुव्हिजच्या शेरशाह चित्रपटाचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा आडवाणीदेखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे.


तर बिजय आनंदची पत्नी सोनाली खरे हिनेदेखील पोस्टर शेअर करीत इंस्टाग्रामवर लिहिले की, शब्दांत व्यक्त करू शकत नाही. सुपरलक.

शेरशाह चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून कारगील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. यात कारगील वॉरमधील हिरो विक्रम बत्रा यांची कथा सांगण्यात येणार आहे. यात सिद्धार्थ आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील बिजय आनंदची भूमिका अद्याप समजू शकलेली नाही.

 बिजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ साली मालिका आसमांमधून केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

काजोल व अजय देवगण यांसारख्या कलाकारांसोबत त्याने काम केले. या चित्रपटात त्याने काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका केली होती. या चित्रपटातील अभिनयाने बिजयने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर काही कालावधीनंतर त्याने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. काही काळ मालिकांमध्ये काम केले.

१९९८ साली औरत मालिकेत तो दिसला होता. त्यानंतर २००२ साली रामायणमध्ये त्याने लक्ष्मणची भूमिका साकारली होती. त्यानंतर तब्बल सोळा वर्षे बॉलिवूड व टेलिव्हिजनमधून तो गायब झाला होता. अचानक पुन्हा एकदा मालिकेतून कमबॅक केले. दिल ही तो है मालिकेत मुख्य भूमिका साकारून पुनरागमन केले. त्यानंतर सिया के राम मालिकेत त्याने राजा जनकची भूमिका केली होती.

सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर त्याने मराठी अभिनेत्री सोनाली खरेसोबत लग्न केले. त्या दोघांना एक मुलगी असून तिचे शनाया आहे. त्यांनी सिनेसृष्टीत काम न करण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी त्याने योगाभ्यासचे ट्रेनिंग घेतले आणि स्वतःचे योगा सेंटर सुरू केले. अभिनयातून वेळ काढत तो योगा शिबिरही घेत असतो. 

Web Title: Sonali Khare's husband Bijay Anand will be seen in Shershah