जग्गू दादा फिटनेस कोच; स्मृती इराणी यांनी फोटो शेअर करत दिलं भन्नाट कॅप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:20 PM2023-12-14T15:20:40+5:302023-12-14T15:23:36+5:30

स्मृती अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी  सेलिब्रिटींसोबत आजही त्यांचे नाते-संबंध घट्ट आहेत. 

Smriti Irani shared photo with Jackie Shroff | जग्गू दादा फिटनेस कोच; स्मृती इराणी यांनी फोटो शेअर करत दिलं भन्नाट कॅप्शन

जग्गू दादा फिटनेस कोच; स्मृती इराणीं फोटो शेअर करत दिलं भन्नाट कॅप्शन

'क्योकी सांस भी कभी बहू थी' ही मालिका माहित नाही असं कोणीच नसेल. घराघरात पाहिल्या जाणाऱ्या या मालिकेतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी  'तुलसी' या भूमिकेमुळे लोकप्रिय झाल्या होत्या. मालिकांमध्ये काम करुन त्यांनी लोकप्रियता मिळवली. छोट्या पडद्यावरील आदर्श सून म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. स्मृती इराणी यांचा अभिनेत्री आणि थेट केंद्रीय मंत्री असा रंजक प्रवास आहे. आज स्मृती अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी  सेलिब्रिटींसोबत आजही त्यांचे नाते-संबंध घट्ट आहेत. 

आज स्मृती इराणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. स्मृती ईराणी यांनी दोन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ आणि निर्माते जेडी मजेठिया यांच्यासोबत स्मृती यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

 स्मृती ईराणी कॅप्शनमध्ये म्हणाल्या, ‘डायटच्या सल्ल्याचे दोन प्रकार…प्रचंड मेहनत पण चमत्कार नाही.  1) भिडू वजन कमी कर.. स्वतःला फिट ठेव, फॅट नको होऊ रे  अंडी खा, वांगी खा, अंड खा, वांगी खा... 2) बहिणबाई वजन कम कर... डायट कर कोणाला माहिती पडणार नाही…'सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्मृती ईराणी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या पोस्टला कमेंट केली, 'तुमचे वजन कमी झाले आहे. जास्त फिट दिसत आहे'. तर आणखी एकाने लिहले, 'तुमचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे'. तर युझरनं कमेंट केली, 'ऐकावं सगळ्यांचे करावे मनाचे'. सोशल मीडियावर स्मृती ईराणी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Web Title: Smriti Irani shared photo with Jackie Shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.