वयाच्या 13 व्या वर्षीच ड्रग्सच्या आहारी गेला होता स्मिता पाटीलचा लेक, 'हे' ठरलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 09:35 IST2024-11-10T09:34:14+5:302024-11-10T09:35:30+5:30

कमी वयात व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे त्याचे आयुष्य जवळपास उद्धवस्त झालं होतं.

Smita Patil Son Prateik Babbar Reveals His Drug Addiction Began At 13 | वयाच्या 13 व्या वर्षीच ड्रग्सच्या आहारी गेला होता स्मिता पाटीलचा लेक, 'हे' ठरलं कारण

वयाच्या 13 व्या वर्षीच ड्रग्सच्या आहारी गेला होता स्मिता पाटीलचा लेक, 'हे' ठरलं कारण

Prateik Babbar on Drug Addiction : आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांना ओळखले जाते. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर यानेही कलाविश्वात पदार्पण केलं.    मात्र, राज बब्बर वा स्मिता पाटील यांना जी लोकप्रियता मिळाली ती अद्याप प्रतिकला मिळालेली नाही. केवळ इंडस्ट्रीच नाही तर खऱ्या आयुष्यातही त्याने अनेक खस्ता खाल्ल्या. कमी वयात व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे त्याचे आयुष्य जवळपास उद्धवस्त झालं होतं. नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या प्रतीक बब्बरने ड्रग्ज आणि व्यसनावर कशी मात केली, यावर भाष्य केलं.

 प्रतीक बब्बरने नुकतंच 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "लोकांना वाटतं की हा चित्रपटात आला, प्रसिद्धी आणि पैसा मिळवला. त्यानंतर मग ड्रग्स घेऊ लागला. पण, तसे नाही. खरतंर मी तेरा वर्षांचा असताना ड्रग्सचा वापर सुरू केला होता. मी घाबरलो होतो. दुर्दैवाने माझे संगोपन वेगळ्या पद्धतीने झालं आणि माझी कौटुंबिक परिस्थिती थोडी कठीण होती. म्हणून मी ड्रग्स सेवनाला सुरुवात केली. चित्रपटातील पैसा, प्रसिद्धी मला या दिशेनं घेऊन गेला नाही".

पुढे प्रतीक म्हणाला की, "अनुभवांच्या वेदनांचा आजही नातेसंबंध आणि आयुष्यातील इतर गोष्टींवर परिणाम होतो. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला गोष्टी चांगल्या करण्यासाठी काम करावे लागते, जे मी अनेक वर्षांपासून करत आहे. यात मला  होणारी पत्नी अभिनेत्री प्रिया बॅनर्जीचा मोठा पाठिंबा आहे. ती मला यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. आम्ही एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करतोय". 

दरम्यान,  प्रतिक लहान असतानाच त्याचं आईचं छत्र हरपलं. प्रतिकला जन्म दिल्यानंतर स्मिता पाटील यांचं निधन झालं. त्यामुळे प्रतिकला आईचं प्रेम मिळालं नाही. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर यांनी अभिनेत्री नादिरा हिच्यासोबत दुसरा संसार थाटला. परंतु, वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे प्रतिक आणि राज यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. प्रतीकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये दिसणार आहे.  
 

Web Title: Smita Patil Son Prateik Babbar Reveals His Drug Addiction Began At 13