​गायिका जोनिता गांधी करणार अभिनय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 11:36 IST2017-02-25T06:06:39+5:302017-02-25T11:36:39+5:30

गायकांनी अभिनय करणे यात काही नवीन नाही. सोनू निगम, हिमेश रेशमिया यांसारखे अनेक गायक अभिनयाकडे वळले आहेत. आता गायिका ...

Singer Jonita Gandhi acting on | ​गायिका जोनिता गांधी करणार अभिनय

​गायिका जोनिता गांधी करणार अभिनय

यकांनी अभिनय करणे यात काही नवीन नाही. सोनू निगम, हिमेश रेशमिया यांसारखे अनेक गायक अभिनयाकडे वळले आहेत. आता गायिका जोनिता गांधी एका चित्रपटात अभिनय करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
जोनिताने ए दिल है मुश्किल या चित्रपटातील ब्रेकअप साँग गायले होते. तसेच दंगल, ढिश्शूम, हायवे, चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटात तिने गाणी गायली आहेत. तिची ही सगळीच गाणी खूप गाजली होती. 
जोनिताने केवळ नवव्या वर्षी गायनाला सुरुवात केली. खूपच लहान वयात युट्यूबवरील गायिका म्हणून तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली. 21 व्या वर्षापर्यंत तर ती युट्युब आयकॉन बनली होती. ती आता एका चित्रपटात काम करणार आहे.
दिग्दर्शक सिद्धार्थ आचार्यने जोनिताला त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी विचारले असून यासाठी तिने होकारदेखील दिला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जुलैमध्ये कॅनडामध्ये होणार आहे. डिजिटल युगात यश मिळवणाऱ्या एका मुलीची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या कथेचा जोनिताच्या आयुष्याशी खूपच जवळचा संबंध असल्याने या चित्रपटात काम करायला ती खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही तसेच या चित्रपटात कोणकोणते कलाकार जोनितासोबत मुख्य भूमिकेत असणार याचा सध्या विचार सुरू आहे. याविषयी जोनिता सांगते, "मी गायनाशिवाय दुसरी कोणत्या क्षेत्रात काम करू की नाही या द्विधा अवस्थेत मी होते. या चित्रपटाच्या कथेत आणि माझ्या आयुष्यात खूप साम्य आहे आणि त्यामुळेच मी हा चित्रपट करण्याचा विचार केला. या चित्रपटाचे चित्रीकरण कॅनडामध्ये होणार असून चित्रपटांच्या तारखांबाबत सध्या आमच्या चर्चा सुरू आहेत." 

Web Title: Singer Jonita Gandhi acting on