Shocking: गोविंदाने सोनाली बेंद्रेला बॉलिवूडमध्ये दिला होता पहिला ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 12:37 IST2017-03-02T07:07:29+5:302017-03-02T12:37:29+5:30

गोविंदा बॉलिवूडचा हिरो...तो पुन्हा एकदा 'लो आ गया हिरो' म्हणत रूपेरी पडद्यावर एंट्री मारण्यासाठी सज्ज झाला आहे. याच सिनेमाच्या ...

Shocking: Govinda gave Sonali Bendrella Bollywood first break? | Shocking: गोविंदाने सोनाली बेंद्रेला बॉलिवूडमध्ये दिला होता पहिला ब्रेक?

Shocking: गोविंदाने सोनाली बेंद्रेला बॉलिवूडमध्ये दिला होता पहिला ब्रेक?

विंदा बॉलिवूडचा हिरो...तो पुन्हा एकदा 'लो आ गया हिरो' म्हणत रूपेरी पडद्यावर एंट्री मारण्यासाठी सज्ज झाला आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी सध्या गोविंदा त्याची पत्नी सुनिता आहुजासह तो सध्या टीव्ही वरील वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावतोय. विशेष म्हणजे नुकतेच गोविंदाने चला हवा येऊ द्या च्या सेटवर हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने एक खुलासा केला आहे. हे रहस्य खुद्द गोविंदाने इतक्या वर्षानंतर का उघड केले या मागच कारण अद्यापही गुलदस्त्याच आहे. भूमिका कोणतीही असो तिला न्याय देणारी अभिनेत्री म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे. बॉलिवूडमध्ये सोनालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले. छम छम करता हैं... या अगं बाई अरेच्चा सिनेमातील गाण्यावर थिरकत सोनालीने रसिकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सोनालीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स आणि स्टाईलसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे. प्रत्येकजण आपल्या मेहनतीवर यश संपादन करत असतो. मात्र सोनाली बेंद्रेला पहिला ब्रेक गोविंदान मिळवून दिला असल्याचे खुद्द गोविंदानेच या कार्यक्रमात सांगितले. जी मुलगी त्यावेळी गोविंदाला सुंदर वाटायची तिला गोविंदा सिनेमात हिरोईन बन असा सल्ला द्यायचा. त्यात असेच सोनाली ब्रेंदे दिसली ती खूप सुंदर दियासची तिला गोविंदाने तू इतकी सुंदर दिसतेस सिनेमात हिरोइन म्हणून काम देतो तुला असे विचारताच सोनालीनेही होकार दिला आणि तिची अभिनेत्री म्हणून वाटचाल सुरु झाली असेल गोविंदाने सांगितले. मात्र अनेर रसिकांसाठी गोविंदाने केलेला खुलासा हा धक्कादायक वाटला. कारण सोनाली बेंद्रेच नाहीतर अशा अनेक हिरोईन आहेत ज्यांना गोविंदाने पहिला ब्रेक मिळवून दिला आहे यांवर अनेकांना गोविंदा नेमके आत्ताच का हे बोलुन दाखवले? असे अनेक प्रश्न रसिकांना पडले आहेत.  

'जिस देस में गंगा रेहता है' सिनेमात गोविंदा आणि सोनाली बेंद्रे या दोघांची रोमँटीक केमिस्ट्री रसिकांना भावली होती. या सिनेमात दोघांच्याही अभिनयाचेही खूप कौतुक करण्यात आले होते. मात्र सोनाली बेंद्रेने गोविंदासह सिनेमात झळकण्यापूर्वी ती मॉडेलिंग करत होती.अतुल अग्निहोत्रीसह सोनालीने नाराज सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.हे सत्य गोंविदाच काय कोणीही नाकारू शकत नाहीय. बहुधा गोविंदा या सगळ्या गोष्टींपासून अनत्रिज्ञ असावा. 

Web Title: Shocking: Govinda gave Sonali Bendrella Bollywood first break?