शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात आहे विमानतळाएवढी सुरक्षा, 'डंकी' फेम अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 12:01 IST2023-12-19T12:00:09+5:302023-12-19T12:01:09+5:30

विक्रम कोचरने शाहरुखच्या मन्नत बाबतीतील एक सिक्रेट उघड केलं.

Shahrukh Khan s 'Mannat bunglow has airport-like security reveals Dunki fame actor vikram kochar | शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात आहे विमानतळाएवढी सुरक्षा, 'डंकी' फेम अभिनेत्याचा खुलासा

शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात आहे विमानतळाएवढी सुरक्षा, 'डंकी' फेम अभिनेत्याचा खुलासा

शाहरुख खान (Shahrukh Khan) आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानींच्या या सिनेमात झळकत आहे. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण' आणि नंतर 'जवान' हे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आता 'डंकी'कडूनही शाहरुखला अपेक्षा आहेत. जर डंकी हिट झाला तर हा या वर्षातला शाहरुखचा सलग तिसरा यशस्वी चित्रपट ठरेल. नुकतंच सिनेमातील सहकलाकार विक्रम कोचरने (Vikram Kochar) शाहरुखच्या मन्नत बाबतीतील एक सिक्रेट उघड केलं.

अभिनेता विक्रम कोचर एका मुलाखतीत म्हणाला, 'जेव्हा आम्ही शाहरुखला पहिल्यांदा भेटायला जात होतो तेव्हा त्याने आम्हाला त्याच्या मन्नत बंगल्यावर बोलावले. आम्ही लिफ्टमध्ये गेलो तिथे सुरक्षा तपासणी झाली. तिथे एक भव्य हॉल होता, विशाल प्रवेशद्वार आणि लॉबी होती. अगदी विमानतळावर किंवा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असावी तशी सुरक्षा तैनात होती. तिथे प्रत्येक गोष्ट स्कॅन केली जात होती.'

तो पुढे म्हणाला, 'आम्ही शाहरुखला भेटायला एका खोलीत पोहोचलो. त्याचा विनम्र स्वभाव पाहून मी खूपच प्रभावित झालो. तो खरा माणूस आहे. शाहरुखसोबत आम्ही स्क्रीप्ट वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्याने मी आत्ताच झोपेतून उठल्याचंही आम्हाला सांगितलं. तो सगळ्यांसोबतच एकसारखं आणि मनमोकळेपणाने वागत होता हे पाहून मीही चकित झालो होतो. शाहरुखसोबत काम करणं सोप्पं गेलं कारण तो तुम्हाला खूपच कंफर्टेबल करतो. स्क्रीप्टबाबतीत कोणाचे काही वेगळे विचार असतील तर तो सगळ्यांचं ऐकूनही घेतो. आपण कोणत्या स्टारसोबत काम करतोय असं वाटतच नाही.'

'डंकी' सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होत आहे. सिनेमात तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी यांच्याही भूमिका आहेत. अवैधरित्या परदेशात जाणाऱ्या लोकांवर डंकीची कहाणी आधारित आहे. 

Web Title: Shahrukh Khan s 'Mannat bunglow has airport-like security reveals Dunki fame actor vikram kochar