शाहरुखनेच रिजेक्ट केला DON 3, कारण आलं समोर; म्हणाला, "पहिल्या दोन सिनेमांमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:59 AM2023-08-11T11:59:18+5:302023-08-11T12:14:33+5:30

'डॉन 3' मध्ये काम करण्यासाठी स्वत: शाहरुख खाननेच नकार दिला असल्याचं समोर आलंय.

shahrukh khan himself rejected don 3 says had given everything in first two parts gave james bond example | शाहरुखनेच रिजेक्ट केला DON 3, कारण आलं समोर; म्हणाला, "पहिल्या दोन सिनेमांमध्ये..."

शाहरुखनेच रिजेक्ट केला DON 3, कारण आलं समोर; म्हणाला, "पहिल्या दोन सिनेमांमध्ये..."

googlenewsNext

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'डॉन 3' (Don 3) ची अखेर दिग्दर्शक फरहान अख्तरने (Farhan Akhtar) घोषणा केली आणि जे ऐकिवात होतं तेच झालं. 'डॉन 3' मध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) नाही तर रणवीर सिंह (Ranveer Singh) असणार हे स्पष्ट झालं. 'डॉन 3'चा टीझर रिलीज होताच नेटकऱ्यांच्या कमेंट्समध्ये उड्या पडल्या. शाहरुख नाही तर 'डॉन 3' नाही अशाच प्रतिक्रिाय अपेक्षेप्रमाणे येत होत्या. फरहान अख्तरला तर अक्षरश: शिव्या दिल्या गेल्या. पण खरी गोष्ट वेगळीच आहे. 'डॉन 3' मध्ये काम करण्यासाठी स्वत: शाहरुख खाननेच नकार दिला असल्याचं समोर आलंय.

फरहान अख्तरच्या निकटवर्तियाने सांगितले, 'तुम्हाला वाटतं का फरहान कोणा दुसऱ्या अभिनेत्याबद्दल विचार तरी करेल. पण शाहरुखला आता डॉन फ्रँचायझीमध्ये कामच करायचं नाही या त्याच्या निर्णयावर तो ठाम होता. शाहरुखला असं वाटतं की त्याने डॉनच्या पहिल्या दोन सिनेमांमध्ये सर्वकाही दिलं आहे.'

फरहानने शाहरुखला समजावण्याचा प्रयत्न केला. लोक दुसऱ्या अभिनेत्याला 'डॉन' म्हणून स्वीकारणार नाहीत. तर यावर शाहरुख जेम्स बॉण्डचं उदाहरण देत म्हणाला, 'जेम्स बॉण्डच्या फिल्म्समध्येही बऱ्याच अभिनेत्यांनी ते कॅरेक्टर केलं. शॉन कॉनरी ते डेनियल क्रेगपर्यंत या अभिनेत्यांनी जेम्स बॉण्ड साकारला. पुढेही इतर अभिनेते साकारतील. मग असंच काहीसं डॉनसोबत का नाही होऊ शकत?'

यावरुनच कळतं की शाहरुख खानने फरहानसमोर कोणताच पर्याय सोडला नाही. एकतर फरहान दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन डॉन 3 करु शकत होता किंवा मग त्याने कायमचा डबाबंद करण्याचा निर्णय घेतला असता. याचवेळी रणवीर सिंहची सिनेमात एंट्री झाली. 

रणवीर सिंहची प्रेक्षकांमध्ये वेगळी इमेज आहे. दिल्लीवाला मुलगा आणि चुलबुला अशाच भूमिकांमध्ये रणवीरला पाहिलं आहे. नुकताच त्याचा रॉकी और रानी सिनेमा रिलीज झाला. यातही त्याची तशीच भूमिका होती. 'लुटेरा'शिवाय त्याने एकही गंभीर भूमिका केलेली नाही. त्यामुळे आता 'डॉन'ची भूमिका रणवीरला झेपेल का हे 2025 मध्ये सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. 

Web Title: shahrukh khan himself rejected don 3 says had given everything in first two parts gave james bond example

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.