करिना कपूर नव्हे तर ही अभिनेत्री होती शाहिद कपूरचे पहिले प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:24 IST2017-10-27T07:24:40+5:302017-10-27T13:24:50+5:30

शाहिद कपूर आज बॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्यापैकीं एक आहे.  शाहिदने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पण चित्रपटांपेक्षा जास्त ...

Shahid Kapoor's first love was Kareena Kapoor | करिना कपूर नव्हे तर ही अभिनेत्री होती शाहिद कपूरचे पहिले प्रेम

करिना कपूर नव्हे तर ही अभिनेत्री होती शाहिद कपूरचे पहिले प्रेम

हिद कपूर आज बॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्यापैकीं एक आहे.  शाहिदने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पण चित्रपटांपेक्षा जास्त नेहमीच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. 

सध्या शाहिद मीरा राजपूत बरोबर लग्न करून आपल्या सुखी संसारात खुश आहे. पण एक काळ असा होता की त्याचे नाव बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बेबो म्हणजेच करिना कपूर बरोबर जोडण्यात आले होते. दोघांचे अफेर त्यावेळेस फार चर्चेत राहिले होते. पण तुम्हाला हे माहिती आहे का शाहिदचे पाहिले प्रेम करीना कपूर नव्हते. होय, तुम्ही बरोबर वाचलात शाहिद कपूरचे पहिले प्रेम करिना कपूर नव्हते. 

करिना कपूरबरोबर असलेले शाहिदचे अफेर आणि नंतर त्याचा झालेला ब्रेकअप तुम्हा सर्वांनाच माहीत आहे पण करिना आयुष्यात येण्या आधी शाहिदचे अफेअर आणखीन एका अभिनेत्रीसोबत होते. शाहिदच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांने जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. सर्वात प्रथम शाहिद म्युझिक व्हिडिओ मधूनच सगळ्यांसमोर आला होता. आर्यन बँडचे हिट गाणे 'आंखो मै तेरा ही चेहरा' तुमच्या लक्षात असेलच याच गाण्यापासून शाहिदने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 
'आंखो मै तेरा ही चेहरा' या गाण्यापासून शाहिदच्या करिअर सुरुवात झाली खरी पण याच गाण्यात त्याच्यासोबत असलेली अभिनेत्री ऋषिता भट्टसोबत अफेअरची चर्चादेखील सुरु झाली.  मीडिया रिपोर्टनुसार शाहिदचे हे अफेअर फार काळ टिकले नाही. ऋषिताने २००१मध्ये आलेला शाहरुख खानचा चित्रपट अशोकामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते पण तिला खरी ओळख २००३ मध्ये आलेला चित्रपट हसिल चित्रपटातून मिळाली. ऋषिता एक मॉडेल असून तिने बांगला फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा काम केले आहे.

शाहिद कपूरचा पद्मावती चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तो राजा रावल रतन सिंगची भूमिका साकारणार आहे. तसेच त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Shahid Kapoor's first love was Kareena Kapoor