Deepika Padukone Birthday :  शाहरूखने दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला अभिनेत्रीचा ‘पठाण’मधील लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 01:31 PM2023-01-05T13:31:10+5:302023-01-05T13:31:19+5:30

Shah Rukh Khan, Deepika Padukone : होय, शाहरूख खानने दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीपिकाचा ‘पठाण’मधील (Pathaan) लुक शेअर केला आहे.

shah rukh khan wish deepika padukone on her birthday shared pathan look | Deepika Padukone Birthday :  शाहरूखने दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला अभिनेत्रीचा ‘पठाण’मधील लुक

Deepika Padukone Birthday :  शाहरूखने दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला अभिनेत्रीचा ‘पठाण’मधील लुक

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone )आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करतेय. आता दीपिकाचा बर्थ डे म्हटल्यावर शुभेच्छांचा वर्षाव होणारच. चाहत्यांसोबत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मग किंगखान कसा मागे राहणार? होय, शाहरूख खानने (Shah Rukh Khan) दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शाहरूखने दीपिकाचा ‘पठाण’मधील (Pathaan) लुक शेअर केला आहे.

या फोटोत दीपिकाच्या हातात गन दिसतेय. चेहऱ्यावर जखमा आहेत. हे पोस्टर बघता, ‘पठाण’मध्ये दीपिका जबरदस्त अ‍ॅक्शन लुकमध्ये दिसणार असं वाटतंय.

या पोस्टसोबत शाहरूखने लिहिलंय, ‘ओ माय डिअरेस्ट दीपिका, प्रत्येक संभाव्य भूमिकेत तू स्क्रीनवर जादू करण्यासाठी स्वतःला विकसित केलं आहेस. तुझा अभिमान आहे. तू यशाची नवनवीन शिखरं गाठावीस, या शुभेच्छा.... हॅपी बर्थ डे...खूप सारं प्रेम...’
‘पठाण’ या सिनेमात शाहरूख व दीपिका लीड रोलमध्ये आहे. याआधी दोघांनी ओम शांती ओम, हॅपी न्यू ईअर आणि चेन्नई एक्स्प्रेसमध्ये एकत्र काम केलं आहे. या जोडीचे हे तिन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. आता ही जोडी ‘पठाण’मध्ये एका वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे.

10 जानेवारीला येणार ‘पठाण’चा ट्रेलर
 आत्तापर्यंत सिनेमाची दोन गाणी रिलीज झाली आहेत. या दोन्ही गाण्यात दीपिका व शाहरूखची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाला. ‘बेशरम रंग’ या गाण्यावरचा वादही तापला. अशात अद्याप ‘पठाण’चा ट्रेलर रिलीज झालेला नाही.  पण येत्या 10 जानेवारीला ‘पठाण’चा ट्रेलर रिलीज होणार आहे. ‘पठाण’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला चित्रपटगृहांत रिलीज होतोय. यात जॉन अब्राहमही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
 

Web Title: shah rukh khan wish deepika padukone on her birthday shared pathan look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.