SEE PIC : सोनाक्षी सिन्हा पुन्हा कथित बॉयफ्रेंड बंदी सचदेवसोबत झाली स्पॉट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2017 01:45 PM2017-03-18T13:45:20+5:302017-03-18T19:16:03+5:30

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड बंटी सचदेव यांच्यातील सिक्रेट अफेअर कधीच लपून राहिले नाही; मात्र त्यांनी कधीच ...

SEE PIC: Sonakshi Sinha again spotted the alleged boyfriend with Sachdev. | SEE PIC : सोनाक्षी सिन्हा पुन्हा कथित बॉयफ्रेंड बंदी सचदेवसोबत झाली स्पॉट!!

SEE PIC : सोनाक्षी सिन्हा पुन्हा कथित बॉयफ्रेंड बंदी सचदेवसोबत झाली स्पॉट!!

googlenewsNext
िनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड बंटी सचदेव यांच्यातील सिक्रेट अफेअर कधीच लपून राहिले नाही; मात्र त्यांनी कधीच त्यांच्यातील नातेसंबंधांचा खुलासा केला नसल्याने त्यांच्या नात्याविषयी आजही सस्पेन्स कायम आहे. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीला बंटी सचदेव याच्याबरोबर एका नाइट क्लबमधून बाहेर येताना बघण्यात आले होते. यावेळी दोघे पार्टी, डिनर आणि सोशललाइज करताना बघावयास मिळाले. आता पुन्हा एकदा हे दोघे स्पॉट झाले असून, त्यांच्यातील नाते किती घट्ट आहे, हेच यावरून दिसून येत आहे. 



तसं बघितलं तर अद्यापपर्यंत या दोघांचा एकत्र असलेला एकही फोटो क्लिक केला गेला नाही; मात्र दोघे एकाच ठिकाणावरून बाहेर पडताना बºयाचदा बघण्यात आल्याने दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याच्या चर्चां मात्र नेहमीच पुढे आल्या आहेत. आता स्पॉट झालेल्या या दोघांनी बराच वेळ एकत्र घालविल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी सोनाक्षी व्हाइट कलर टॉप आणि स्काय ब्ल्यू सीन्समध्ये दिसली. तर दुसरीकडे तिचा बॉयफ्रेंड बंटीला कारमध्ये स्पॉट केले. यावेळीदेखील दोघांचा एकत्र फोटो क्लिक करता आला नाही, मात्र त्यांच्या एकूणच हावभावावरून दोघेही डिनर डेटसाठी गेले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. 



काही दिवसांपूर्वी या दोघांना बंटीची बहीण सीमा खान हिच्या बर्थडे पार्टीत बघितले होते. दोघांनीही या पार्टीत खूप एन्जॉय केला. यावेळी दोघांनी एकत्र चांगला वेळ व्यतित केला. थोडक्यात खान परिवाराकडून सोनाक्षीला यापूर्वीच हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी तर अशाही बातम्या आल्या होत्या की, सोनाक्षी लवकरच बंटीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे; मात्र सोनाक्षीची आई पूनम कपूर हिला बंटी तिच्यासाठी योग्य वाटत नसल्याने या चर्चा केवळ अफवा असल्याचे समोर आले. 



२०१२ पासून हे दोघे एकमेकांना डेट करीत आहेत; मात्र अद्यापपर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्यातील खुलासा केलेला नाही. दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचे निश्चित असल्याने हे दोघे त्यांच्यातील नाते केव्हा जाहीरपणे सांगणार, हे बघणे मजेशीर असेल, असो. सोनाक्षीला बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून ओळखले जाते, त्यामुळे तिने तिच्या बॉयफ्रेंडविषयी जाहीरपणे खुलासा करावा अशा अपेक्षा तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात नसतील तरच नवल. 

Web Title: SEE PIC: Sonakshi Sinha again spotted the alleged boyfriend with Sachdev.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.