Sania Mirza: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने सानियाला रोमँटिक अंदाजात केलं Wish, म्हणाला-...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:35 AM2022-11-15T11:35:52+5:302022-11-15T11:43:37+5:30

Sania Mirza-Shoaib Malik: टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत.

Sania Mirza birthday amid divorce news husband pakistan cricketer Shoaib Malik wish Sania with romantic post | Sania Mirza: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने सानियाला रोमँटिक अंदाजात केलं Wish, म्हणाला-...

Sania Mirza: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने सानियाला रोमँटिक अंदाजात केलं Wish, म्हणाला-...

googlenewsNext

टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. दोघे वेगळे होणार असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये केला जात आहे. असेही बोलले जात आहे की दोघे लवकरच वेगळे होण्याची घोषणा करू शकतात आणि शोएब मलिकनं सानियाची फसवणूक केली आहे. मात्र, या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सानिया आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. शोएबने सानियाला रोमँटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले - तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.  तुला निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा. या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या. विशेष म्हणजे या पोस्टची वेळ. रात्री उशिरा 1.15 च्या सुमारास शोएबने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत शोएब आणि सानिया एकत्र दिसत आहेत.

शोएबच्या या पोस्टला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. याला लाखो लाईक्सही मिळाले आहेत. चाहत्यांनी दोघांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली. शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाचे कारण पाकिस्तानी अभिनेत्री (आयशा उमर) आहे, जिच्यासोबत शोएब मलिकने बोल्ड फोटोशूट केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही कायदेशीर अडचणी सोडवल्यानंतर घटस्फोटाची घोषणा करणार आहेत.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी मोठी घोषणा केली आहे. दोघेही लवकरच एकत्र दिसणार आहेत. वास्तविक, सानिया आणि शोएब एक टॉक शो आणणार असल्याची घोषणा करण्यात आलीये. या कार्यक्रमात टेनिस सेन्सेशन सानिया आणि तिचा पती शोएब मलिक एकत्र दिसणार आहेत. त्याने त्याच्या शोचे नावही उघड केलेय. 'मिर्झा मलिक शो' असे या नवीन कार्यक्रमाचे नाव असेल. त्याचे पोस्टरही चांगलेच व्हायरल होत आहे. हा शो पाकिस्तानी वाहिनीवर येणार आहे.


 

Web Title: Sania Mirza birthday amid divorce news husband pakistan cricketer Shoaib Malik wish Sania with romantic post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.