सलमान खानने दोन्ही आईंसोबत साजरा केला 'मदर्स डे'; बालपणीचा 'तो' फोटो शेअर करत भाईजान झाला भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:14 IST2026-05-11T10:13:26+5:302026-05-11T10:14:02+5:30
सलमान खानची भावनिक पोस्ट; सलमा खान आणि हेलन यांच्यावर केला प्रेमाचा वर्षाव

सलमान खानने दोन्ही आईंसोबत साजरा केला 'मदर्स डे'; बालपणीचा 'तो' फोटो शेअर करत भाईजान झाला भावुक
बॉलिवूडचा 'सुलतान' सलमान खानने मातृदिनाचे औचित्य साधत आपल्या दोन्ही आईंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सलमानने सोशल मीडियावर त्याची जन्मदात्री आई सलमा खान आणि सावत्र आई हेलन यांच्यासोबतचे काही दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत, जे सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
सलमानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या या एका फोटोत सलमान त्याची आई सलमा खान यांच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. हा त्याच्या लहानपणीचा अत्यंत निरागस असा फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोत सलमाननं प्रेमानं आपल्या आईच्या डोक्यावर हात ठेवलेला दिसतोय. तर तिसऱ्या फोटोमध्ये सलमान हा सलमा आणि हेलन या आपल्या दोन्ही आईंसोबत दिसत आहे. "हॅपी मदर्स डे" असे साधे पण प्रभावी कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. सलमानने ही पोस्ट शेअर करताच काही वेळातच त्यावर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा पाऊस पडला.
आगामी चित्रपटांची मोठी रांग
सध्या सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामात प्रचंड व्यस्त आहे. चाहत्यांना त्याच्या पुढील चित्रपटांची मोठी उत्सुकता आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांचा 'मातृभूमी', दाक्षिणात्य दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांचा 'CVC 63' आणि राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या सुपरहिरो चित्रपटामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.