लडाखमध्ये ४५ दिवस कठीण ट्रेनिंग अन् जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'मातृभूमी' सिनेमासाठी सलमानने केली कसून तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:04 IST2026-04-22T14:04:04+5:302026-04-22T14:04:49+5:30

जखमांवर मात करत लडाखच्या डोंगररांगांमध्ये सलमान खानने गाळला घाम; ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’साठी केले आजवरचे सर्वात कठीण ट्रान्सफॉर्मेशन!

salman khan did special training in ladakh for upcoming movie matrubhumi | लडाखमध्ये ४५ दिवस कठीण ट्रेनिंग अन् जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'मातृभूमी' सिनेमासाठी सलमानने केली कसून तयारी

लडाखमध्ये ४५ दिवस कठीण ट्रेनिंग अन् जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'मातृभूमी' सिनेमासाठी सलमानने केली कसून तयारी

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहे. अपूर्वा लखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटासाठी सलमानने लडाखच्या डोंगररांगांमध्ये अत्यंत कठीण ट्रेनिंग घेतली आहे. जिथे त्याने आपल्या जखमांची पर्वा न करता फिटनेसला एका नव्या उंचीवर नेले आहे. 

प्रोडक्शनशी संबंधित एका जवळच्या सूत्राने सांगितलं की, “सलमान खानने या चित्रपटासाठी अफाट फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याने लडाखच्या उंच प्रदेशात ट्रेनिंग केली. जिथे त्याने जड वजनांच्या सेशन्ससोबतच कठीण एंड्युरन्स ड्रिल्सही केल्या. गेल्या काही वर्षांत त्याने घेतलेल्या सर्वात कठीण फिटनेस रूटीनपैकी हे एक आह., जे या भूमिकेसाठी त्याची जबरदस्त कमिटमेंट दाखवते. लडाखमधील ४५ दिवसांच्या शेड्यूलदरम्यान, सुपरस्टारने आपली फिजीक टिकवून ठेवण्यासाठी कॅलिस्थेनिक्सवर आधारित वर्कआउट रूटीन अवलंबले. कारण अशा उंचीवरच्या शूटिंग लोकेशन्सवर पूर्ण जिम सेटअप नेणे खूप कठीण होते.”


सूत्र पुढे म्हणाले, “आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलमान अनेक जखमांशी झुंज देत असतानाही हे सगळं करत होता. अशा परिस्थितीत इतक्या तीव्रतेने, शिस्तीने आणि जिद्दीने ट्रेनिंग करणं… खरं सांगायचं तर, हे फक्त सलमान खानच करू शकतो”. ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली असून अपूर्वा लखिया यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातून शौर्य, बलिदान आणि जिद्दीचे प्रभावी चित्रण दिसणार आहे.  सलमान खानसोबत या चित्रपटात चित्रगंदा सिंगदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title : 'मातृभूमि' के लिए सलमान खान की लद्दाख में कठिन ट्रेनिंग का खुलासा।

Web Summary : सलमान खान ने 'मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस' के लिए लद्दाख में ज़बरदस्त शारीरिक प्रशिक्षण लिया। चोटों के बावजूद, उन्होंने भूमिका के प्रति समर्पण दिखाते हुए कठिन कसरत की। सलमान खान फिल्म्स द्वारा निर्मित और अपूर्व लाखिया द्वारा निर्देशित इस फिल्म में चित्रांगदा सिंह भी हैं।

Web Title : Salman Khan's rigorous training in Ladakh for 'Matrubhoomi' revealed.

Web Summary : Salman Khan underwent intense physical training in Ladakh for 'Matrubhoomi: May War Rest in Peace'. Despite injuries, he performed demanding workouts, showcasing dedication to his role. The film, produced by Salman Khan Films and directed by Apoorva Lakhia, also stars Chitrangada Singh.