..तर अभिनय क्षेत्र सोडणार होता सलमान खान; 34 वर्षांपूर्वीच तयार होता बॅकअप प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 01:51 PM2023-11-09T13:51:14+5:302023-11-09T14:22:05+5:30

एकेकाळी सलमान खानने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता.

salman khan backup plan was become director | ..तर अभिनय क्षेत्र सोडणार होता सलमान खान; 34 वर्षांपूर्वीच तयार होता बॅकअप प्लॅन

..तर अभिनय क्षेत्र सोडणार होता सलमान खान; 34 वर्षांपूर्वीच तयार होता बॅकअप प्लॅन

भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. जगभरात त्याचे चित्रपट आवडणारे करोडो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते काहीही करायला तयार असतात. सोशल मीडियावर सलमान खानची फॅन फॉलोइंगही खूप आहे. पण तुम्हाला माहिती आहे एकेकाळी सलमानने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता.


सलमानने 1988 साली 'बीबी हो तो ऐसी' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. या चित्रपटानंतर 1989 मध्ये 'मैने प्यार किया' रिलीज झाला होता.  ज्यामधून सलमान खानला विशेष लोकप्रियता मिळाली. पण, चित्रपटाच्या रिलीजपूर्वी सलमान खानने ठरवले होते की, जर हा सिनेमा फ्लॉप झाला तर तो अभिनय सोडून दिग्दर्शक बनणार आहे. हा खुलासा अभिनेता साहिल चड्ढा याने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान केला होता.

साहिल चड्ढा सांगितले की, 'एकदा सलमान खान आणि मी टी-सीरीजच्या ऑफिसजवळ भेटलो होतो. तेव्हा सलमान म्हणाला होता, ''मैंने प्यार किया' हा चित्रपट येत आहे. जर चित्रपट चांगला झाला तर मी अभिनेता होईन, नाहीतर दिग्दर्शक होईन'. शिवाय सलमानने एका स्क्रिप्टवर कामही केलं. त्याने आमिर खानला ती स्क्रिप्ट सांगण्याचा प्रयत्न केला. पण, आमिरने नकार दिल्यावर सलमानने मला त्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आणि मी होकार दिला.   'मैने प्यार किया' रिलीज झाल्यानंतर सलमान खान सुपरस्टार झाला. आमची भेट झाली तेव्हा मी त्याला मला ऑफर केलेल्या चित्रपटाबद्दल विचारले तर आता ती वेळ नाही असे तो म्हणाला होता', असे साहिलने सांगितले होते. 

सलमान खान हा सध्या 'टायगर ३' हा चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'टायगर ३' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.या महिन्यात दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. यात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. यावेळी इमरान हाश्मी चित्रपटात खलनायक झाला आहे. 

Web Title: salman khan backup plan was become director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.