राजपालला पुन्हा सहा दिवसांची कोठडी मिळण्याची कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 13:06 IST2016-06-05T07:36:12+5:302016-06-05T13:06:12+5:30

दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादवला राहिलेल्या सहा दिवसांच्या कोठडीसाठी १५ जुलैपूर्वी तिहार जेलसमोर आत्मसमर्पण करण्याचे शुक्रवारी आदेश दिले. ...

Reasons for getting six days custody of Rajpal ... | राजपालला पुन्हा सहा दिवसांची कोठडी मिळण्याची कारणे...

राजपालला पुन्हा सहा दिवसांची कोठडी मिळण्याची कारणे...

ल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादवला राहिलेल्या सहा दिवसांच्या कोठडीसाठी १५ जुलैपूर्वी तिहार जेलसमोर आत्मसमर्पण करण्याचे शुक्रवारी आदेश दिले. २०१३ साली न्यायालयासमोर खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी राजपालला १० दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी ३ डिसेंबर २०१३ ते ६ डिसेंबर २०१३ या चार दिवसात राजपाल यादवला जेलमध्ये रहावे लागले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्याच्या विनंतीवरुन उर्वरित शिक्षा निलंबित केली होती.
न्यायाधीश एस. रवींद्र भट आणि दीपा शर्मा यांनी २०१३ साली पीठाने दिलेली कायम राखताना आदेश दिले की प्रक्रियेचे पालन करताना यादव याची झालेली चूक स्वीकारली जाणार नाही. स्वत:च्या आचरणाविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी योग्य कालावधी दिलेला असतानाही तो खोट्या गोष्टीवर कायम राहिला.
पीठाच्या अनुसार या प्रकरणाचा लांबलचक इतिहास सांगतो की, प्रत्येक वेळी शपथपत्राचे उल्लंघन झाले आहे. आपल्याविरुद्ध कारवाई का करु नये, याची विचारणा करण्यासाठी त्याला बोलाविले असताना राजपाल आणि त्याच्या पत्नीने खोटी आणि टाळणारी उत्तरे दिली, ज्यामध्ये खोट्या शपथपत्राला खरे ठरविण्याची घटना आहे.
पीठाने २ डिसेंबर २०१३ रोजी दाखल केलेल्या शपथपत्राविरुद्ध आपत्ती दर्शविताना शपथपत्र खोटे असून, पत्नीच्या सह्या खोट्या असल्याचे म्हटले होते.
पाच कोटीचे कर्ज फेडण्यास राजपाल आणि त्याची पत्नी असमर्थ ठरल्यानंतर दिल्लीतील व्यापारी एम. जी. अग्रवाल यांनी वसुलीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. २०१० साली यादवने पहिला चित्रपट तयार करण्यासाठी हे कर्ज घेतले होते. न्यायालयाला फसविण्यासाठी राजपाल यादवने खोटे शपथपत्र दाखल केल्याचा यादव यांच्यावर आरोप होता. 



Web Title: Reasons for getting six days custody of Rajpal ...