​रणवीर-दीपिका ब्रेकअपच्या मार्गावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 10:24 IST2016-06-25T04:54:12+5:302016-06-25T10:24:12+5:30

बी-टाऊनमधील सर्वात हॉट कपल म्हणजे ‘रणवीर-दीपिका’. आॅन स्क्रीन असो वा आॅफ स्क्रीन दोघांची केमिस्ट्री नेहमीच दिसून येते. परंतु जसे ...

Ranveer-Deepika on the breakup? | ​रणवीर-दीपिका ब्रेकअपच्या मार्गावर?

​रणवीर-दीपिका ब्रेकअपच्या मार्गावर?

-टाऊनमधील सर्वात हॉट कपल म्हणजे ‘रणवीर-दीपिका’. आॅन स्क्रीन असो वा आॅफ स्क्रीन दोघांची केमिस्ट्री नेहमीच दिसून येते.

परंतु जसे की, सर्वच कपलबाबत घडते तसे या पडद्यावरच्या ‘बाजीराव-मस्तानी’मध्येसुद्धा काही तरी बिनसले आहे.

काही आठवड्यांपूर्वी दीपिका वेळेत वेळ काढून बुडापेस्टला ‘राबता’च्या शुटिंगला जाण्या आधी रणवीरला भेटायला पॅरिस येथे गेली होती.

जगातील सर्वात रोमॅण्टिक शहरात दोघांमध्ये रोमॅन्सऐवजी कडाक्याचे भांडण झाल्याचे सांगण्यात येतेय. भांडणाचं कारण काय आहे माहितीए?

रणवीरसोबत असलेली रिलेशनशिप दीपिका मीडियासमोर का नाकारते यावरून तो तिच्यावर चिडला. त्यामुळे दीपिका नाराज होऊन तेथून निघून गेली. 

आता ते जरी कपल असले तरी दोघांनी कधीच रिलेशनशिपची अधिकृत माहिती किंवा घोषणा केलेली नाही.  नंतर ‘टिपिकल बॉयफ्रें ड’प्रमाणे रणवीरने दीपिकाची नाराजी दूर करण्यासाठी मुंबईत तिला एअरपोर्टवर घेण्यासाठी गाडी पाठवली खरी मात्र हे भांडण दोघांच्या ब्रेकअपची सुरुवात तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: Ranveer-Deepika on the breakup?