'बरं झालं की पळून नाही जावं लागलं', लग्नानंतर बायकोसाठी रणदीप हुडाची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:27 IST2023-12-21T13:25:26+5:302023-12-21T13:27:21+5:30

नुकतेच लिन लैश्रामने तिचा 38 वा वाढदिवस साजरा केला.  

Randeep Hooda pens a heartfelt note for his wife Lin Laishram on her birthday | 'बरं झालं की पळून नाही जावं लागलं', लग्नानंतर बायकोसाठी रणदीप हुडाची खास पोस्ट

'बरं झालं की पळून नाही जावं लागलं', लग्नानंतर बायकोसाठी रणदीप हुडाची खास पोस्ट

बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा आणि लीन लैश्राम हे नवविवाहित जोडपं सध्या चर्चेत आहे. नुकतेच लिन लैश्रामने तिचा 38 वा वाढदिवस साजरा केला.  यावेळी केवळ चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही तिचे अभिनंदन केले. पण, लक्ष वेधलं ते रणदीप हुडाच्या खास पोस्टने. पत्नी लीनसाठी रणदीप हुडाने खास पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  

रणदीपने पोस्टमध्ये लिन लैश्रामसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो हा मुंबई रिसेप्शनमधील आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रणदीप आणि लिन बाईकवर बसलेले दिसत आहेत. रणदीपने कॅप्शनमध्ये लिहिले, ' बरं झालं पळून जावं लागलं नाही. हायवेपासून तर इथपर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा मिसेस. तू माझ्या आयुष्यात आहेस आणि आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता देतेस, यासाठी मी स्व:ताला भाग्यवान समजतो. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे'. या पोस्टवर लिनने लिहिले, "लव्ह यू मोर".

रणदीप आणि लीन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लीन मूळची मणिपूरमधील इंफाळ येथील असून ती मॉडेल, अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वूमनदेखील आहे. तिने प्रियांका चोप्राच्या 'मेरी कॉम' या सिनेमात काम केलं आहे. अलिकडेच ती करिना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमात झळकली. तर रणदीप 'स्वातंत्र्य वीर सावरकर' मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारणार आहे. रणदीप या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे.

Web Title: Randeep Hooda pens a heartfelt note for his wife Lin Laishram on her birthday