"थलपती विजय आणि तृषाने आता लग्न केलं पाहिजे...", बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा कपलला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:33 IST2026-05-09T11:33:19+5:302026-05-09T11:33:36+5:30
थलपती विजयच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच त्या दोघांनी एकत्र एका लग्नात हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्या दोघांनी लग्न करावं सल्ला बॉलिवूड अभिनेत्रीने त्यांना दिला आहे.

"थलपती विजय आणि तृषाने आता लग्न केलं पाहिजे...", बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा कपलला सल्ला
थलपती विजयने तामिळनाडूत विजय मिळवल्यानंतर तो चर्चेत आला आहेत. विजयच्या पर्सनल लाइफचीही बरीच चर्चा होते आहे. थलपती विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांचं अफेअर असल्याचं बोललं जात आहे. थलपती विजयने तामिळनाडू निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तृषा त्याला भेटायला घरी गेली होती. थलपती विजयच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच त्या दोघांनी एकत्र एका लग्नात हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्या दोघांनी लग्न करावं सल्ला बॉलिवूड अभिनेत्रीने त्यांना दिला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने हे वक्तव्य केलं आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणाली, "मला वाटतं की विजय आणि तृषा छान कपल आहेत. त्यांनी आता लग्न केलं पाहिजे. जर खरंच त्यांनी लग्न केलं तर मी त्यांच्या मेहेंदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावेन. तृषाला मी खूप आधीपासून ओळखते. आम्ही दोघींनी एकत्रच करिअरला सुरुवात केली होती. तृषा साऊथची टॉप अभिनेत्री बनली. आणि मी बॉलिवूडमध्ये माझं नशीब आजमावत होते".
थलपती विजय आणि तृषाच्या अफेअरच्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा अभिनेत्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज करत त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं अफेअर असल्याचा खुलासा त्याच्या पत्नीने केला होता. थलपती विजय आणि तृषाने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. 'घिल्ली', 'कुरुवी', 'लियो' या सिनेमांमध्ये ते दिसले होते.