​२ कोटी रुपए खर्चून उभारला राजकुमार रावचा ‘लग्नमंडप’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2017 10:07 AM2017-05-05T10:07:21+5:302017-05-05T15:37:21+5:30

राजकुमार राव सध्या अनेक चित्रपटांत बिझी आहे. लवकरच त्याचे ‘बहन होगी तेरी’ आणि ‘राबता’ हे दोन चित्रपट रिलीज होणार ...

Rajkumar Rao's 'wedding ceremonies' set by spending 2 crores! | ​२ कोटी रुपए खर्चून उभारला राजकुमार रावचा ‘लग्नमंडप’!!

​२ कोटी रुपए खर्चून उभारला राजकुमार रावचा ‘लग्नमंडप’!!

googlenewsNext
जकुमार राव सध्या अनेक चित्रपटांत बिझी आहे. लवकरच त्याचे ‘बहन होगी तेरी’ आणि ‘राबता’ हे दोन चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय आणखी एका चित्रपटात राजकुमार दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘शादी में जरूर आना’. होय, या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. खरे तर राजकुमारच्या चित्रपटांचा बजेट खूप कमी असतो. पण ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपट त्याला अपवाद आहे. या चित्रपटाच्या एका सेटसाठी २ कोटी रुपए खर्च करण्यात आले आहेत. हा सेट आहे, राजकुमारच्या लग्नमंडपाचा. या सेटसाठी २ कोटी रुपए खर्च केले गेलेत. प्रॉडक्शनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांसाठी पैसा महत्त्वाचा नव्हता. त्यापेक्षा त्यांना हा सेट लवकरात लवकरच हवा होता. शेवटी हेच झाले. आर्ट डायरेक्टर अरूप अधिकारी यांनी सेट डिझाईनर शबीऊल हसन आणि टीमसोबत मिळून केवळ तीन दिवसांत हा सेट उभा केला. हा सेट उभारताना एक आव्हान होते. हा सेट यापूर्वीच्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवलेल्या लग्नाच्या सेटपेक्षा एकदम वेगळा असायला हवा होता. हीच निर्मात्यांची अट होती. हे आव्हान आर्ट डायरेक्टर आणि त्यांच्या टीमने स्वीकारले आणि केवळ तीन दिवसांत एक भव्य, शानदार सेट उभा केला. या सेटची एक झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.







ALSO READ : First Poster : ‘बहन होगी तेरी’मध्ये राजकुमार राव अन् श्रुती हासनची जमली केमिस्ट्री!

डायरेक्टर अनुभव सिन्हाची पत्नी रत्ना सिन्हा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवते आहे. राजकुमार याच्याशिवाय या चित्रपटात कृती खरबंदा हिची मुख्य भूमिका आहे. अलाहाबाद, लखनौ व कानपूर येथे या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे.

Web Title: Rajkumar Rao's 'wedding ceremonies' set by spending 2 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.