रागनीति! गुलाबी टॉप, निळ्या जीन्समध्ये नवी नवरी आली, राघव-परिणीतीचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:32 PM2023-09-25T14:32:07+5:302023-09-25T14:36:30+5:30

न्यूली वेड कपलचा Video व्हायरल

raghav chadha parineeti chopra looks great together couple spotted in front of camera after wedding | रागनीति! गुलाबी टॉप, निळ्या जीन्समध्ये नवी नवरी आली, राघव-परिणीतीचा Video व्हायरल

रागनीति! गुलाबी टॉप, निळ्या जीन्समध्ये नवी नवरी आली, राघव-परिणीतीचा Video व्हायरल

googlenewsNext

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आता चड्डा कुटुंबाची सून झाली आहे. परिणीतीने आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadha) यांच्याशी लग्नगाठ बांधली. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर आता हे नवविवाहित जोडपं पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलं आहे. बोटीतून बाहेर येतानाचा कपलचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

गुलाबी रंगाचा टॉप, ब्लू जीन्स, हातात गुलाबी बांगड्या अशा लुकमध्ये नवी नवरी परिणीती कॅमेऱ्यासमोर आली. तर राघव चड्डा नेहमीसारखेच हँडसम लुकमध्ये दिसले. उदयपूरच्या लेकमध्ये बोटीतून बाहेर येतानाच पापाराझींनी त्यांच्याभोवती गराडा घातला. यावेळी दोघांनी कॅमेऱ्यासमोर हसतच पोज दिली. हे न्यूली वेड कपल आता दिल्लीला किंवा मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.

राघव आणि परिणीतीच्या लग्नात अनेक कलाकारांनी आणि नेत्यांनी हजेरी लावली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लग्नात उपस्थित होते. तर सानिया मिर्झा, मनिष मल्होत्रा, भाग्यश्रीसह अनेक बॉलिवूड कलाकार परिणीतीच्या शाही विवाहसोहळ्याचा भाग होते. यानंतर परिणीती-राघव यांचं दिल्ली आणि मुंबई येथे रिसेप्शन पार पडणार आहे.

Web Title: raghav chadha parineeti chopra looks great together couple spotted in front of camera after wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.