नेहमी चर्चेत राहणाऱ्या राधे माँ चा मुलगा आहे बॉलिवूड अभिनेता, तुम्ही पाहिलं का त्याला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:19 AM2022-04-01T11:19:37+5:302022-04-01T11:21:40+5:30

Radhe Maa's Actor Son : राधे माँ चा मुलगा अभिनेता असून त्याने काही बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. आता तो ओटीटीवर डेब्यू करत आहे.

Radhe Maa's son is a bollywood actor, now working on OTT in Inspector Avinash | नेहमी चर्चेत राहणाऱ्या राधे माँ चा मुलगा आहे बॉलिवूड अभिनेता, तुम्ही पाहिलं का त्याला?

नेहमी चर्चेत राहणाऱ्या राधे माँ चा मुलगा आहे बॉलिवूड अभिनेता, तुम्ही पाहिलं का त्याला?

googlenewsNext

अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेली राधे माँ (Radhe Maa) सर्वांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या कारणांनी ही स्वंयघोषित संत नेहमीच चर्चेत असते. तिच्याबाबत बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण तिच्या परिवाराबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. राधे माँ चा मुलगा एक अभिनेता असल्याचं क्वचितच कुणाला माहीत असेल. राधे माँ चा मुलगा अभिनेता असून त्याने काही बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. आता तो ओटीटीवर डेब्यू करत आहे. तो रणदीप हुड्डासोबत राधे माँ चा मुलगा हरजिंदर सिंह (Harjinder Singh) दिसणार आहे.

राधे माँ आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. जगभरात तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. फार कमी लोकांना माहीत नाही की, राधे माँ ला एक मुलगाही आहे. जो बॉलिवूड सिनेमातही दिसला आहे. तो 'ड्रीम गर्ल' आणि 'आय एम बन्नी' सिनेमात दिसला होता. त्याचं नाव हरजिंदर सिंह आहे. आता तो रणदीप हुड्डासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. 

राधे माँ चा मुलगा हरजिंदर सिंहने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याला बालपणापासूनच क्रिकेटर किंवा अभिनेता व्हायचं होतं. तो म्हणाला की, 'मला दोन गोष्टींची खूप आवड आहे. मला अभिनेता व्हायचं होतं किंवा क्रिकेटर. जेवढं मला समजतं क्रिकेटरचं एक वय असतं. एकेकाळी अभिनयातही वयाचं बंधन होतं. आता तसं नाहीये. तुम्ही कधीही कॅमेरासमोर जाऊ शकता. मी एमआयटी पुणे येथून शिकलो. तिथे जेही इव्हेंट्स होत होते त्यात मी असायचो. मला तेव्हा लक्षात आलं होतं की, मला स्टेजवर राहणं आनंद देतं'.

रणदीप हुड्डासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत हरजिंदरने सांगितलं की, 'त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच चांगला होता. एक अभिनेता म्हणून मला ते खूप आवडतात. मी त्यांना लखनौमध्ये सांगितलं होतं की, मी अनेक सिनेमे केवळ त्यांच्यामुळे पाहिले आहे'. हरजिंदर म्हणाला की, त्याच्याकडे आणखी काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत.  
 

Web Title: Radhe Maa's son is a bollywood actor, now working on OTT in Inspector Avinash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.