ऐकलंत का, तैमूर बहिण सारा अली खानपेक्षाही आहे लोकप्रिय, हा घ्या पुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 08:00 IST2019-02-05T08:00:00+5:302019-02-05T08:00:00+5:30

बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये  रंगली.त्यामुळे ...

Publicity Score Card of Taimur khan He beat His Sister Sara Ali Khan | ऐकलंत का, तैमूर बहिण सारा अली खानपेक्षाही आहे लोकप्रिय, हा घ्या पुरावा?

ऐकलंत का, तैमूर बहिण सारा अली खानपेक्षाही आहे लोकप्रिय, हा घ्या पुरावा?

बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये  रंगली.त्यामुळे प्रत्येकवेळी तैमूरच्या बाललीला मीडियाच्या कॅमे-यात कॅप्चर झाल्या आणि त्याला भरघोस पसंतीही मिळाली बघता बघता तैमुर आज कोण्या बड्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. आज सगळ्या स्टारकिड्सच्या लोकप्रियतेच्या यादीत तैमुरचे नाव हे आघाडीवर आहे. इतकेच नव्हेतर लोकप्रियतेच्या यादीत बॉलिवूडच्या सगळ्याच स्टार्सनाही तैमुरने मागे टाकले आहे इतकी त्याची लोकप्रियता आहे. मुळात तैमुर हा पतौडी कुटुंबातला सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड बनला आहे.  

सारा अली खान आणि तिचा लहान भाऊ तैमूर दोन्ही स्टार किड्स गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान आपल्या जन्मापासूनच सोशल मीडियाचा लाडका आहे. तर अमृता सिंह आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान गेल्या काही महिन्यांपासून आपल्या बॉलीवूड डेब्यूमुळे त्यानंतर तिच्या सिनेमांमुळे आणि नंतर अफेअरमुळेही चर्चेचा विषय बनली.

मुळात 'सिम्बा' सिनेमाच्या यशामूळे बॉलीवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जात असलेली सारा आणि बॉलीवूडमधला सर्वात लोकप्रिय स्टारकिड हे दोघेही आपल्या आई-वडिलांपेक्षा जास्त लोकप्रिय स्टार-किड्स आहेत. ह्या ‘टॉक ऑफ दि टाऊन स्टार किड्स’च्या लोकप्रियतेची तूलना स्कोर ट्रेंड्स इंडियाने केल्यावर जी आंकडेवारी समोर आलीय त्यानूसार, डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि वायरल न्यूजमध्ये 100 गुणांसह सारा अली खान पूढे आहे. तर ‘बेबी तैमूर’ने डिजिटल न्यूजमध्ये केवळ 4 टक्के, न्यूजपेपर कव्हरेजमध्ये 12 टक्के आणि व्हायरल न्यूजमध्ये 42 टक्के गुण मिळवलेले आहेत.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सहसंस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “तैमूर अली खानची व्हायरल न्यूजमध्ये मजबूत पकड आहे. तो एकुलता एक स्टारकिड आहे, ज्याच्या घराबाहेर त्याच्या एक फोटोसाठी कित्येक तास मीडिया ताटकळत उभी असते. आणि त्याचा एक फोटो इंटरनेटवर आल्यावर मिळाणा-या लाइक्सची संख्या लाखांमध्ये जाते. पण तैमूर आपल्या अपिअरन्सच्याशिवाय न्यूजमध्ये नाही. पण त्याची मोठी बहीण सारा आपल्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या दोन्ही फिल्म्समूळे न्यूजप्रिंट, डिजीटल न्यूज आणि सोशल मीडियावर सर्वत्र आहे. तिचे इंटर्व्ह्युज, अवॉर्ड फंक्शनमधला प्रेजेंस, बॉलीवूड मॅगझिनच्या कव्हरपेजवर सूध्दा ती झळकल्याने, तिच्याविषयीच्या बातम्या सातत्याने येत असतात.''

अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Web Title: Publicity Score Card of Taimur khan He beat His Sister Sara Ali Khan