​प्रियांका चोप्रा बनणार का झीनत अमान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 15:59 IST2017-05-05T10:27:59+5:302017-05-05T15:59:54+5:30

झीनत अमान...बॉलिवूडची एकेकाळची सर्वाधिक बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री. झीनतचे आयुष्य पडद्यावर पाहायला कुणाला आवडणार नाही? खुद्द झीनत अमान यांनाही ...

Priyanka Chopra to become Ameen? | ​प्रियांका चोप्रा बनणार का झीनत अमान?

​प्रियांका चोप्रा बनणार का झीनत अमान?

नत अमान...बॉलिवूडची एकेकाळची सर्वाधिक बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री. झीनतचे आयुष्य पडद्यावर पाहायला कुणाला आवडणार नाही? खुद्द झीनत अमान यांनाही त्यांच्या आयुष्यावर बायोपिक बनावे, असे वाटत असेल काय?  अलीकडे एका इव्हेंटमध्ये झीनत यावर मनमोकळेपणे बोलल्या. झीनत लवकरच एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ‘लव्ह लाईफ अ‍ॅण्ड स्क्रू अप्स’ या वेबसीरिजमध्ये झीनत आपल्याला दिसणार आहेत. याच वेबसीरिजच्या प्रीमिअरला झीनत उपस्थित होत्या. तुमच्या आयुष्यावर बायोपिक आल्यास त्यात तुमची भूमिका आजच्या कुण्या अभिनेत्रीने साकारावी, असे तुम्हाला वाटते? असा प्रश्न झीनत यांना यावेळी विचारण्यात आला. यावेळी झीनत यांनी कुणाचे नाव घेतले माहितीयं? प्रियांका चोप्रा. होय, प्रियांकाने माझे बायोपिक करावे, असे मला वाटते. ती सुंदर आणि प्रेमळ आहे. माझ्या भूमिकेला ती पडद्यावर योग्य न्याय देऊ शकेल, असे मला वाटते, असे झीनत म्हणाल्या. एका प्रसिद्ध निर्मात्याने माझ्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याच्या इराद्याने माझ्याशी संपर्क केला होता. पण यासाठी मी तयार आहे वा नाही, मला ठाऊक नाही, असेही त्या म्हणाल्या.



ALSO READ : जाणून घ्या कोण आहेत सत्तरच्या दशकातील बोल्ड अभिनेत्री?

यापूर्वी दिग्गज गायिका आशा भोसले यांनीही  त्यांच्या बायोपिकसाठी प्रियांकाचेच नाव घेतले होते. माझ्या आयुष्यावर बायोपिक आले तर प्रियांकाच योग्य पर्याय असेल. माझी भूमिका तीच चांगली वठवू शकेल, असे आशा दीदी म्हणाल्या होत्या. एकंदर काय तर आशा भोसले आणि आता झीनत अमान या दोघींनीही प्रियांकाच्या खात्यात आपले वोट टाकले आहे. प्रियांकाच्या कामाला ही मनापासून मिळालेली दाद आहे, असे आम्हाला वाटते. तुम्हाला काय वाटते, ते नक्की कळवा.

Web Title: Priyanka Chopra to become Ameen?