आॅनस्क्रीन बॉयफ्रेंडसोबत होळीच्या रंगात रंगली प्रिया प्रकाश; व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 18:35 IST2018-03-03T13:05:03+5:302018-03-03T18:35:11+5:30

सध्या देशभरात होळी हा उत्सव साजरा केला जात असून, सेलिब्रिटींमध्येही त्याचा प्रचंड उत्साह बघावयास मिळत आहे. सेन्सेशन गर्ल प्रिया प्रकाशचाही धुळवड खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Priya Prakash plays with Holi colors; Video Viral! | आॅनस्क्रीन बॉयफ्रेंडसोबत होळीच्या रंगात रंगली प्रिया प्रकाश; व्हिडीओ व्हायरल!

आॅनस्क्रीन बॉयफ्रेंडसोबत होळीच्या रंगात रंगली प्रिया प्रकाश; व्हिडीओ व्हायरल!

सेकंदांच्या एका छोट्याशा व्हिडीओमधून रातोरात सुुपरस्टार बनलेली प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, रातोरात सेंसेशन बनलेल्या प्रियाचा आणखी एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया तिचा आॅनस्क्रीन बॉयफ्रेंड रोशनसोबत धुळवड खेळताना बघावयास मिळत आहे. हा व्हिडीओ स्वत: प्रियानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘याअगोदर अशाप्रकारची धुळवड कधीच खेळली नाही.’ व्हिडीओमध्ये प्रिया आणि रोशन एकमेकांवर रंगांची उधळण करताना बघावयास मिळत आहेत. 

विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये दोघेही कुठल्या क्लासरूममध्ये नाहीत, शिवाय त्यांनी स्कूल ड्रेसही परिधान केलेला नाही. अशातही त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने त्यांची लोकांमध्ये असलेली क्रेझ लक्षात येते. व्हिडीओमध्ये प्रियाने पांढºया रंगाच्या टॉपसोबत डेनिम जीन्स घातलेली आहे, तर रोशन टी-शर्ट आणि जीन्सवर बघावयास मिळत आहे. 
 

व्हिडीओमध्ये रोशन आणि प्रिया दोघेही आपल्या मित्रांसोबत बघावयास मिळत आहे. एकमेकांना रंगांची उधळण करताना त्यांच्यातील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. दरम्यान, प्रिया प्रकाश वॉरियर ‘ओरू अदार लव’ या मल्याळम चित्रपटातून डेब्यू करीत आहे. या चित्रपटाचे गाणे जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा प्रियाचा २६ सेकंदांचा व्हिडीओ वाºयासारखा व्हायरल झाला. या व्हिडीओने प्रियाला देशभरात लोकप्रियता मिळवून दिली. व्हिडीओमध्ये प्रिया डोळ्यांनी इशारा करीत रोशनला प्रेमाची कबुली देते. प्रियाच्या याच अदा प्रेक्षकांवर मोहिनी घालणाºया ठरल्या. 

Web Title: Priya Prakash plays with Holi colors; Video Viral!