‘जुडवा २’ मध्ये परिणीती-वरूण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 16:31 IST2016-08-30T10:56:05+5:302016-08-30T16:31:18+5:30

 वरूण धवन सध्या ‘ढिशूम’ च्या रिलीज नंतर चांगलाच चर्चेत आला आहे. ढिशूमनंतर त्याने लगेचच ‘जुडवा’ चा सिक्वेल साईन केला. ...

Parvati-Varuna in 'twin twins'? | ‘जुडवा २’ मध्ये परिणीती-वरूण?

‘जुडवा २’ मध्ये परिणीती-वरूण?

 
रूण धवन सध्या ‘ढिशूम’ च्या रिलीज नंतर चांगलाच चर्चेत आला आहे. ढिशूमनंतर त्याने लगेचच ‘जुडवा’ चा सिक्वेल साईन केला. मात्र, दिग्दर्शकांसमोर एकच प्रश्न होता तो म्हणजे वरूणची हिरोईन यात कोण असेल?

आता दिग्दर्शकांनी घोषित केले आहे की, ‘जुडवा २’ मध्ये हिरोईन म्हणून परिणीती आणि जॅकलीन दिसणार आहेत. दिग्दर्शक म्हणाले,‘ आम्हाला वरूणसोबत बॉलीवूडच्या टॉप अ‍ॅक्ट्रेसपैकी दोनची निवड करावयाची आहे. परिणीती-वरूण ‘ढिशूम’ मधील एका गाण्यासाठी एकत्र आले होते.

आणि ढिशूम मध्ये जॅकलीन ही वरूणची हिरोईन नसून जॉनचा लव्ह इंटरेस्ट दाखवण्यात आली आहे. ‘जानेमान आह’ या गाण्यात हिट ठरलेली जोडी वरूण-परिणीती यांना पुन्हा एकदा आता ‘जुडवा २’ मध्ये पाहता येऊ शकते. सध्या परीकडे तारखा फार कमी असून तिचे आगामी बरेच प्रोजेक्ट्स लवकरच येतील. 

Web Title: Parvati-Varuna in 'twin twins'?