लग्नानंतर मालदीवला गेली अभिनेत्री, स्विमिंगपूलमधील बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली, "मी हनिमूनला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 11:40 IST2023-10-17T11:40:03+5:302023-10-17T11:40:47+5:30

बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केला स्विमिंगपूलमधील बोल्ड फोटो, तुम्ही ओळखलं का?

parineeti chopra vacation trip to maldives after marriage shared bold photo viral | लग्नानंतर मालदीवला गेली अभिनेत्री, स्विमिंगपूलमधील बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली, "मी हनिमूनला..."

लग्नानंतर मालदीवला गेली अभिनेत्री, स्विमिंगपूलमधील बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली, "मी हनिमूनला..."

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. परिणीती २४ सप्टेंबरला आप खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकली. उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. परिणीती आणि राघव यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर परिणीती मालदीवला गेली आहे. 

परिणीतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन मालदीव ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये परिणीतीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. परिणीतीने स्विमिंगपूलमधील पाठमोरा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात चुडा असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "मी हनिमूनला आलेले नाही! हा फोटो माझ्या वहिणीने काढला आहे", असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

परिणीती मालदीवला हनिमूनसाठी आलेली नाही. मुलींच्या पिकनिकसाठी मालदीवला आल्याचं तिने म्हटलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. परिणीतीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लग्नानंतर परिणीतीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’ येथून शिक्षण घेतलं आहे. तिथेच त्यांची मैत्री झाली. काही महिन्यांपूर्वी राघव चड्ढा परिणीतीला तिच्या शूटिंगदरम्यान पंजाबमध्ये भेटले होते. तेव्हापासून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 
 

Web Title: parineeti chopra vacation trip to maldives after marriage shared bold photo viral