पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमा नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रदर्शनाची तारीख समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:38 PM2023-11-28T12:38:32+5:302023-11-28T12:45:42+5:30

'मै अटल हूं' सिनेमातील पंकज त्रिपाठींच्या लूक पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

pankaj tripathi main atal hoon movie release on jan 2024 know the details | पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमा नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रदर्शनाची तारीख समोर

पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमा नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रदर्शनाची तारीख समोर

दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारे पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी 'मै अटल हूं' सिनेमामुळे चर्चेत आहेत. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी वाजपेयींची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'मै अटल हूं' सिनेमातील पंकज त्रिपाठींच्या लूक पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

ज्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो सिनेमा लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असलेला 'मै अटल हूं' सिनेमा नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. १९ जानेवारी २०२४ रोजी मै अटल हूं सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे या सिनेमासाठी प्रेक्षकांना थोडी आणखी वाट बघावी लागणार आहे. 'मै अटल हूं' या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं आहे. 

'मै अटल हूं' सिनेमात अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी पंकज त्रिपाठींनी खूप मेहनत घेतल्याचं मुलाखतीत सांगितलं होतं.  "मी शूटिंगच्या दिवसांत फक्त खिचडी खात होतो. 'मै अटल हूं' चित्रपटाचं शूटिंग ६० दिवस सुरू होतं. या ६० दिवसांत मी फक्त खिचडी खाल्ली. ती खिचडीदेखील मीच बनवायचो. इतर लोक तुमच्यासाठी जेवण कसे बनवतात, हे तुम्हाला कळू शकत नाही. मी तेल आणि मसाले न वापरता केवळ तांदूळ, डाळ आणि भाज्या वापरुन खिचडी बनवायचो," असं ते म्हणाले होते. 

पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमाची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. डिसेंबर २०२३मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट बघावी लागणार आहे. 

Web Title: pankaj tripathi main atal hoon movie release on jan 2024 know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.