​ ‘पद्मावत’ने पुन्हा वाढवली संजय लीला भन्साळींची चिंता! पण करणी सेना नाही तर ‘हे’ आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 13:52 IST2018-01-31T08:22:06+5:302018-01-31T13:52:06+5:30

सध्या संजय लीला भन्साळी यांच्याइतकी कुठलीही व्यक्ती आनंदी नसेल, असा तुमचा अंदाज असेल. पण भन्साळी आनंदी नाहीत तर नाराज ...

Padmavat again raised the worry of Sanjay Leela Bhansali! But the action is not because the army is 'this' !! | ​ ‘पद्मावत’ने पुन्हा वाढवली संजय लीला भन्साळींची चिंता! पण करणी सेना नाही तर ‘हे’ आहे कारण!!

​ ‘पद्मावत’ने पुन्हा वाढवली संजय लीला भन्साळींची चिंता! पण करणी सेना नाही तर ‘हे’ आहे कारण!!

्या संजय लीला भन्साळी यांच्याइतकी कुठलीही व्यक्ती आनंदी नसेल, असा तुमचा अंदाज असेल. पण भन्साळी आनंदी नाहीत तर नाराज आहेत.  खरे तर, ‘पद्मावत’ला प्रचंड विरोध झाला आणि इतक्या विरोधानंतरही चित्रपट रिलीज झाला. शिवाय अगदी चारचं दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला, यामुळे भन्साळींनी आनंदी असायला हवे. पण भन्साळी नाराज आहेत. आता ही नाराजी कुणावर? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कदाचित भन्साळी करणी सेनेवर नाराज आहेत, असा तुमचा अंदाज असेल. पण नाहीच. भन्साळी करणी सेनेवर नाही तर पायरसी करणाºयांवर नाराज आहेत. होय, भन्साळींचा ‘पद्मावत’ अनेक राज्यांत आॅनलाईन लिक झाला आहे. साहजिकच करणी सेनेच्या विरोधानंतर भन्साळी आता पायरसीमुळे चिंतीत आहेत. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राईम युनिटची मदत मागिल्याचीही खबर आहे. हा विभाग राज्य सरकारद्वारे पायरसी अर्थात डिजिटल चोरीची प्रकरणे बघतो.

आॅनलाईन लिक झाल्यानंतर लोकांनी अगदी फुकटात ‘पद्मावत’ डाऊनलोड करण्याचा सपाटा चालवला आहे. अनेक संकेतस्थळावर हा चित्रपट डाऊनलोड केला जात आहे. यात aeonsource, bigdaddymovies, moviespur, rdxhdचा समावेश आहे. यावर केवळ चित्रपट फ्री डाऊनलोड करणेचं नाही तर आॅनलाईन पाहणे शक्य आहे.  साहजिकच याचा परिणाम ‘पद्मावत’च्या बॉक्सआॅफिस कलेक्शनवर दिसू लागला आहे. मोठ्या वीकेंडनंतरही  गत मंगळवारपासून ‘पद्मावत’च्या कलेक्शनचा ग्राफ अचानक खाली आला आहे. यामागे ‘पद्मावत’ आॅनलाईन लीक होणे हे कारण मानले जात आहे.  त्यामुळे ‘पद्मावत’ लीक झाल्याचे कळताच, भन्साळींनी अ‍ॅन्टी आॅनलाईन पायरसी युनिट व सरकारला मदत मागितली आहे. संबंधित सर्व संकेतस्थळांवर कडक कारवाई करण्याची मागणी भन्साळींनी केली आहे. महाराष्ट्र सायबर डिजिटल विभाग गेल्या चार महिन्यांपासून सुरु झाला आहे.

ALSO READ : संजय लीला भन्साळींच्याच चित्रपटांवर वाद का?
 

Web Title: Padmavat again raised the worry of Sanjay Leela Bhansali! But the action is not because the army is 'this' !!