OMG!!​ रेखाच्या माथी संजय दत्तचे कुंकू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 12:10 IST2017-03-05T06:40:27+5:302017-03-05T12:10:27+5:30

यासिर उस्मान यांनी अभिनेत्री रेखावर लिहिलेल्या पुस्तकात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. होय, हा खुलासा कशाबद्दल तर रेखा ...

OMG !! Rekha Mathi Sanjay Dutt's Kunku !! | OMG!!​ रेखाच्या माथी संजय दत्तचे कुंकू!!

OMG!!​ रेखाच्या माथी संजय दत्तचे कुंकू!!

सिर उस्मान यांनी अभिनेत्री रेखावर लिहिलेल्या पुस्तकात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. होय, हा खुलासा कशाबद्दल तर रेखा कुणाच्या नावाच कुंकू लावते याबाबतचा! रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील नात्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. या अधु-या पे्रम कहानीच्या अनेक कथा तुम्हीही ऐकल्या असतील. रेखाचे पती मुकेश अग्रवाल यांचा मृत्यू झाला आहे. पण तरीही रेखा आपल्या भांगेत कुंकू लावते. तिच्या या कुंकवाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. हे कुंकू ती अमियाभ बच्चन यांच्या नावाचं लावत असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होतेय.  जाते. मात्र, हे खरे नाहीय. कारण आता याबाबत एक वेगळाच खुलासा समोर आला आहे. होय, रेखा अमिताभ यांच्या नावाचं नाही तर संजय दत्तच्या नावाचे कुंकू लावते. आश्चर्य वाटले ना?

 यासिर उस्मान यांच्या पुस्तकात हा खुलासा करण्यात आला आहे. निश्चितपणे या खुलाशाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. 'Rekh: The Untold Story' नुसार, रेखा आणि संजय दत्त यांचं गुप्त पद्धतीने लग्न झालं होतं.  १९८४ मध्ये आलेल्या ‘जमीन आसमान’ या सिनेमाच्या शूटींगवेळी रेखा आणि संजय दत्त हे जवळ आले होते. 

संजय दत्तसोबतच रेखासोबत अमिताभ बच्चन यांचं नाव नेहमीच जोडलं गेलं. मात्र अमिताभ बच्चन यांच्या जीवनात जया बच्चन यांची एन्ट्री झाल्यावर रेखा एकटी पडली होती. त्यामुळेच ती संजय दत्तच्या जवळ आल्याचे बोलले जाते. अशाप्रकारच्या अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे.  

Web Title: OMG !! Rekha Mathi Sanjay Dutt's Kunku !!