आर्यन खान नाही तर या स्टारकिडसोबत खुशी कपूरला करायचाय डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 16:00 IST2019-04-28T16:00:00+5:302019-04-28T16:00:05+5:30

जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. आता जान्हवीची लहान बहीण खुशी कपूरच्या डेब्यूची चर्चा रंगतेय. जान्हवीप्रमाणे खुशीचाही ग्रँड डेब्यू होणार हे तर पक्के आहे. अर्थात कुठल्या चित्रपटातून आणि कुणासोबत हे अद्याप ठरलेले नाही.

not shah rukh khans son aryan khan but khushi kapoor wishes to make her debut with this star kid |  आर्यन खान नाही तर या स्टारकिडसोबत खुशी कपूरला करायचाय डेब्यू!!

 आर्यन खान नाही तर या स्टारकिडसोबत खुशी कपूरला करायचाय डेब्यू!!

जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. आता जान्हवीची लहान बहीण खुशी कपूरच्या डेब्यूची चर्चा रंगतेय. जान्हवीप्रमाणे खुशीचाही ग्रँड डेब्यू होणार हे तर पक्के आहे. अर्थात कुठल्या चित्रपटातून आणि कुणासोबत हे अद्याप ठरलेले नाही. पण एक गोष्ट मात्र चाहत्यांना कळलीय. ती म्हणजे, स्वत: खुशीला कुण्या हिरोसोबत डेब्यू करणे आवडेल.
होय, अलीकडे खुशी व जान्हवी या दोघी बहिणींनी ‘बीएफएफएस’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी खुशी आपल्या डेब्यूबद्दल भरभरून बोलली. कुण्या अ‍ॅक्टरसोबत डेब्यू करायला आवडेल, हेही तिने सांगितले. लोक सध्या माझ्या डेब्यूबद्दल चर्चा करताना दिसतात. मी कधी डेब्यू करणार, कुणासोबत करणार, असे प्रश्न मला विचारतात. हे प्रश्न ऐकून मजा येते.  मी डेब्यू करतेय, हे तर नक्की आहे. पण सध्या तरी नाही. कारण सध्या मी स्कूलमध्ये आहे. त्यामुळे हे इतक्या लवकर तरी होणारे नाही, असे खुशी यावेळी म्हणाली.


यानंतर खुशीला कुणासोबत डेब्यू करणे आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यासाठी तिला तीन पर्यायही देण्यात आले. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, चंकी पांडेचा मुलगा अहान पांडे की, जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी? असा प्रश्न तिला केला गेला. यावर खुशीने अहान पांडेची निवड केली. मी या तिघांपैकी केवळ अहानला अ‍ॅक्टिंग करताना पाहिले आहे. त्यामुळे तो माझ्यासाठी सुरक्षित पर्याय आहे, असे ती म्हणाली.
अर्थात खुशीची मोठी बहीण जान्हवी हिने मात्र खुशीच्या डेब्यूसाठी मिजान जाफरीच्या नावाला पसंती दिली.

Web Title: not shah rukh khans son aryan khan but khushi kapoor wishes to make her debut with this star kid