आमिर-सलमान नाही तर, हा खान भविष्यात असणार हिंदी सिनेमाचा स्टार, अक्षय कुमारने केले भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 15:02 IST2019-08-08T15:00:04+5:302019-08-08T15:02:13+5:30

फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे.

Not aamir Salman Shahrukh Akshay kumar thinks this khan is future of hindi cinema | आमिर-सलमान नाही तर, हा खान भविष्यात असणार हिंदी सिनेमाचा स्टार, अक्षय कुमारने केले भाकित

आमिर-सलमान नाही तर, हा खान भविष्यात असणार हिंदी सिनेमाचा स्टार, अक्षय कुमारने केले भाकित

अक्षय कुमारचा सिनेमा 'मिशन मंगल' खूप चर्चेत आहे. सिनेमाची स्टारकास्ट सध्या प्रोमोशनमध्ये बिझी आहे. एका मुलाखती दरम्यान अक्षय कुमारला कोणता अभिनेता हिंदी सिनेमाचा फ्यूचर असेल. सेंस ऑफ ह्यूमर बघा त्यानेही आमिर-शाहरुख-सलमान खान यांची नाव न घेता. थेट तैमूर अली खानचे नाव घेतले. अक्षय कुमार तैमुरचे नाव घेताच विद्या बालनला हसु आवरले नाही. बी- टाऊनमध्ये तैमूर अली खानची जास्त चर्चा आणि बातम्या ऐकायला मिळतात. इतर स्टार किड्सपेक्षा तैमुरचीच जास्त चर्चा ऐकायला मिळते. तैमुरची लोकप्रियता एका स्टार कलाकाराप्रमाणे आहे. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते.

बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय. त्यामुळे जिथे जिथे करिना जाते तिथे तिथे तैमुरविषयी करिनाजवळ गप्पा गोष्टी केल्या जातात. DID च्या मंचावर एकदा करिनाला तैमुरने कोणत्या क्षेत्रात करिअर करावा असे वाटते ? यावर करिनाने तैमुरने क्रिकेटर बनावे अशी तिची इच्छा असल्याचे सांगितले. तैमूरची देखभाल आणि त्याची काळजी घेण्याला सुपरमॉम बेबोनं प्राधान्य दिलं होतं. 


फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. बॉलिवूडच्या तिन्ही खानांना मात देत अक्षयने या यादीत 33 वे स्थान मिळवले आहे. अक्षयसोबत या यादीत रिहाना, स्कारलेट जॉन्सन, क्रिस इवन्स, केटी पेरी, ब्रेडली कूपर, जॅकी चॅन आणि लेडी गागा या हॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. गतवर्षी या यादीत 40.5 मिलियन डॉलरची कमाईसह अक्षय 76 व्या स्थानावर होता. यावर्षी त्याने 33 व्या स्थानावर झेप घेतली आहे.फोर्ब्सची ही यादी सेलिब्रिटींचे वर्षभरातील उत्पन्न आणि त्यांची प्रसिद्धी यावरून तयार करण्यात येते. 
 

Web Title: Not aamir Salman Shahrukh Akshay kumar thinks this khan is future of hindi cinema