​ कुणीही नाही केले, ते सनी करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 16:29 IST2016-09-04T10:59:11+5:302016-09-04T16:29:11+5:30

सनी लिओनीचे चित्रपट बॉक्सआॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. मात्र हळूहळू सनी बॉलिवूडमध्ये स्वत:चा जम बसवताना दिसते आहे. ए-लिस्ट ...

No one has done it, they will sunny! | ​ कुणीही नाही केले, ते सनी करणार!

​ कुणीही नाही केले, ते सनी करणार!

ी लिओनीचे चित्रपट बॉक्सआॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. मात्र हळूहळू सनी बॉलिवूडमध्ये स्वत:चा जम बसवताना दिसते आहे. ए-लिस्ट चित्रपट मिळणे, हा त्याचाच परिणाम आहे. आता तर सनी असे काही करणार आहे, जे आजपर्यंत कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्री वा बॉलिवूड कलाकाराने केलेले नाही. किंंबहुना आजपर्यंत कुठल्याही बॉलिवूड कलाकारास तशी संधीच मिळालेली नाही. होय, सनी लवकरच होऊ घातलेल्या ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’मध्ये भाग घेणार आहे. या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करणारी सनी ही पहिली बॉलिवूड कलाकार असणार आहे. निश्चितपणे यामुळे सनी सध्या जाम उत्साहात आहे. ‘मी खूप उत्साहात आहे. माझे स्वप्न सत्यात उतरणार आहे,’ असे tweet तिने केले आहे. एकंदर काय तर सनीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Web Title: No one has done it, they will sunny!