न्यूयॉर्क मध्ये पिगी चॉप्स शोधतेय घर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 10:58 IST2016-05-06T05:23:59+5:302016-05-06T10:58:00+5:30

 अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या शूटिंगबरोबरच आणखी एका कामात बिझी झाली आहे. ते म्हणजे ती सध्या घर शोधण्यात अत्यंत बिझी ...

New York Piggy Chops Search Home! | न्यूयॉर्क मध्ये पिगी चॉप्स शोधतेय घर!

न्यूयॉर्क मध्ये पिगी चॉप्स शोधतेय घर!

 
भिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या शूटिंगबरोबरच आणखी एका कामात बिझी झाली आहे. ते म्हणजे ती सध्या घर शोधण्यात अत्यंत बिझी झालीय. मॉनट्रिअल येथे तिने अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या शूटिंगची सुरूवात केली.

सध्या ती हॉलीवूडपट ‘बेवॉच’ च्या शूटिंगसाठी मिआमी येथे शूटिंग करत आहे. बेवॉच ची शूटिंग संपल्यानंतर ती ‘क्वांटिको’ च्या नव्या सीजनसाठी शूटिंग सुरू करणार आहे. आता तर असे कळतेय की, पीसी तिथेच राहण्याचा विचार करतेय.

मॉनट्रिअल मध्ये शूटिंग करत असताना तिने म्हणे तिचे कोस्टार जॅझ मॅस्री आणि जोहन्ना ब्रॅडी यांच्यासोबत घर किरायाने घेतले होते. पण आता ती ‘मनहत्तन’ येथे घर घेण्याचा प्लॅन करते आहे.

तिने तिच्या आईलाही न्यूयॉर्कला दोन आठवड्यांसाठी नेले होते. आईच्या आवडीने तिने काही घर निवडले आहेत.

Web Title: New York Piggy Chops Search Home!