क्रिती सनॉन पुन्हा चर्चेत! अ‍ॅटीट्यूड पाहून नेटकरी भडकले, होतेय जबरदस्त ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 03:30 PM2024-01-25T15:30:00+5:302024-01-25T15:34:26+5:30

क्रिती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिच्या एका व्हिडीओनं नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

netizens trolls Kriti Sanon for being 'rude' to a fan asking for a photograph at Mumbai airport video viral | क्रिती सनॉन पुन्हा चर्चेत! अ‍ॅटीट्यूड पाहून नेटकरी भडकले, होतेय जबरदस्त ट्रोल

क्रिती सनॉन पुन्हा चर्चेत! अ‍ॅटीट्यूड पाहून नेटकरी भडकले, होतेय जबरदस्त ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रितीने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत आणि अतिशय कमी वेळात तिने चाहत्यांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. पण, आता क्रिती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिच्या एका व्हिडीओनं नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉन सध्या त्यांच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच दोघे विमानतळाबाहेर स्पॉट झाले. यावेळी शाहिद 'कपूर' टॅग स्वेटशर्टमध्ये तर क्रिती गडद निळ्या डेनिमसह हाय-नेक स्वेटशर्टमध्ये दिसली. 

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, विमानतळावरून बाहेर पडताना एक चाहती फोटो काढण्यासाठी त्यांच्याजवळ धावत आली. यावेळी चाहतीने हस्तांदोलन करण्यासाठी क्रितीकडे हात पुढे केला. पण, क्रिती सरळ पुढे वळाली. अखेर चाहतीनं शाहिदसोबत फोटो घेतला. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत क्रितीला ट्रोल केलं. एका युजरने लिहिले की, “तिने हात मिळवला नाही, हे किती असभ्य आहे”. तर दुसऱ्यानं लिहिले, “क्रितीनं हस्तांदोलन करायलं हवं होतं'.

क्रिती आणि शाहीदचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात क्रिती ही रोबोटच्या भूमिकेत असणार आहे. चित्रपटाचं एक पोस्टर क्रिती आणि शाहिद यांनी सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. या पोस्टरमध्ये क्रिती आणि शाहिद यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या दोघांची दमदार केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत. तसेच धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
 

Web Title: netizens trolls Kriti Sanon for being 'rude' to a fan asking for a photograph at Mumbai airport video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.