नीतू सिंगनी साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 17:01 IST2016-07-09T11:31:20+5:302016-07-09T17:01:20+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग यांनी आपला ५८ वा वाढदिवस सहकुटुंब शुक्रवारी साजरा केला. यावेळी त्यांचे पती आणि अभिनेते ऋषी ...

Neetu Singi celebrates Birthday | नीतू सिंगनी साजरा केला वाढदिवस

नीतू सिंगनी साजरा केला वाढदिवस

येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग यांनी आपला ५८ वा वाढदिवस सहकुटुंब शुक्रवारी साजरा केला. यावेळी त्यांचे पती आणि अभिनेते ऋषी कपूर, मुलगा अभिनेता रणबीर कपूर, मुलगी रिद्धीमा आणि तिचा पती भारत साहनी, त्यांची मुलगी समारा हे उपस्थित होते.
कभी कभी, अमर अकबर अँथोनी, खेल खेल मे, दुसरा आदमी या चित्रपटात काम केलेल्या नीतू सिंग यांनी १९८० साली ऋषी कपूरसोबत लग्न केले. त्यांना रिद्धीमा (वय ३५) आणि रणबीर कपूर (वय ३३) अशी दोन मुले आहेत.
२०१३ साली बेशरम या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. यामध्ये रणबीर कपूर, ऋषी कपूर आणि पल्लवी शारदा यांनी काम केले होते.

Web Title: Neetu Singi celebrates Birthday