ऋषी कपूर यांच्या निधनानंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या नीतू कपूर, झालेली अशी अवस्था, म्हणाल्या- "मला रोज इंजेक्शन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:31 IST2026-05-09T12:30:59+5:302026-05-09T12:31:47+5:30

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांना रात्री झोप लागायची नाही. त्या दारूच्या आहारी गेल्या होत्या. एवढंच नव्हे तर कधी कधी त्यांना इंजेक्शनही द्यावी लागत होती. 

neetu kapoor revealed that she get depressed after rishi kapoor death | ऋषी कपूर यांच्या निधनानंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या नीतू कपूर, झालेली अशी अवस्था, म्हणाल्या- "मला रोज इंजेक्शन..."

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या नीतू कपूर, झालेली अशी अवस्था, म्हणाल्या- "मला रोज इंजेक्शन..."

नीतू कपूर आणि ऋषी कपूर हे बॉलिवूडमधलं लोकप्रिय कपल. ऋषी कपूर यांच्या निधनाने नीतू कपूर यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीतू कपूर यांनी याबाबत खुलासा केला. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांना रात्री झोप लागायची नाही. त्या दारूच्या आहारी गेल्या होत्या. एवढंच नव्हे तर कधी कधी त्यांना इंजेक्शनही द्यावी लागत होती. 

नीतू कपूर यांनी सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी ऋषी कपूर यांच्या निधनानंतर मानसिकरित्या त्या खचून गेल्याचा खुलासा केला. नीतू कपूर म्हणाल्या, "ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दोन-तीन महिने मला रात्री झोप नाही लागायची. त्यानंतर मी दारूच्या आहारी गेले होते. मग मला त्याची सवय लागली होती. दारू प्यायली नाही तर मला झोपच लागायची नाही. मी माझ्याकडे हेल्थकडे खूप जास्त लक्ष देते. त्यामुळे मलाही स्वत:ला हे सगळं आवडत नव्हतं. मला स्वत:चीच राग यायचा. यातून बाहेर पडण्यासाठी मी डॉक्टरांची मदत घेतली". 

"डॉक्टर रोज घरी यायचे आणि मला इंजेक्शन घ्यावं लागायचं. जवळपास १०-११ दिवस मी इंजेक्शन घेतले. त्यानंतर मला छान वाटू लागलं होतं. मग डॉक्टरांनी इंजेक्शनची आता गरज नाही असं सांगितलं. जेव्हा मी झोपण्यासाठी रुममध्ये जायचे तेव्हा मला भीती वाटायची. मला झोप लागायची नाही", असंही नीतू कपूर यांनी सांगितलं. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पुन्हा सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. तेव्हाही लोकांनी त्यांना ट्रोल केल्याचं नीतू कपूर म्हणाल्या. आता नीतू कपूर दादी की शादी या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नुकताच त्यांचा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.   

Web Title: neetu kapoor revealed that she get depressed after rishi kapoor death