Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनने शेअर केला लेकीचा व्हिडीओ, पाहून चाहत्यांना झाली राधिका आपटेची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 01:50 PM2022-12-11T13:50:50+5:302022-12-11T13:51:18+5:30

Nawazuddin Siddiqui daughter Shora : लाडक्या शोराच्या वाढदिवशी नवाजने एक क्यूट व्हिडीओ पोस्ट करत लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Nawazuddin Siddiqui shares pics of daughter Shora to wish her on birthday | Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनने शेअर केला लेकीचा व्हिडीओ, पाहून चाहत्यांना झाली राधिका आपटेची आठवण

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनने शेअर केला लेकीचा व्हिडीओ, पाहून चाहत्यांना झाली राधिका आपटेची आठवण

googlenewsNext

Nawazuddin Siddiqui daughter Shora :  बॉलिवूड नवाजुद्दीन सिद्दीकीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. बॉलिवूडमध्ये नवाजने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण सध्या चर्चा नवाजची नाही तर नवाजच्या लेकीची आहे. होय, नवाजने लेक शोराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत.  
नवाज आपल्या कुटुंबाला कॅमेऱ्यापासून दूरचं ठेवतो. कुटुंबाबद्दलही तो फार कमी बोलतो. पण लाडक्या शोराच्या वाढदिवशी नवाजने  एक क्यूट व्हिडीओ पोस्ट करत लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.

यात शोराच्या बालपणापासून आत्तापर्यंतचे फोटो पाहायला मिळतात. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स वर्षाव केला आहे. अनेकांनी शोरा पाहून ती राधिका आपटेसारखी दिसत असल्याचं म्हटलं.  नवाज भाई तुझी लेक खूपच सुंदर आहे. ओह, शी इज फॅब अशा आशयाच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

याआधी डॉटर्स डेच्या मुहूर्तावर नवाजने लेक शोराचा फोटो शेअर केला  होता.   तो फोटोही क्षणात व्हायरल झाला होता. या फोटोतील शोराच्या चेह-यावरची क्यूट स्माईल बघून सगळेच तिच्या प्रेमात पडले होते.

शूल आणि सरफरोश या सिनेमातून नवाजने करिअरची सुरुवात केली. पण या सिनेमात त्याच्या वाट्याला आलेली भूमिका इतकी लहान होती की, लोकांनी त्याला नोटही केलं नव्हतं. पण याच छोट्या छोट्या भूमिकांनी नवाजला मोठं बनवलं. इतकं मोठं  की, आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं.

नवाजुद्दीन आज इंडस्ट्रीचं मोठं नाव आहे. 2021 साली त्याचे नेटवर्थ 13 मिलियन म्हणजेच 96 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन प्रत्येक महिन्याला 1 कोटींपेक्षा अधिकची कमाई करतो. कोटींची कमाई करतो.  चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत आपला दबदबा निर्माण करणारा नवाजुद्दीन अलिशान आयुष्य जगतो. अर्थात आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. गावातील घरी वषार्तून एकदा तो नक्की जातो़ शेतात कामही करतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात नवाजुद्दीन गावातील छोट्याशा घरात अनेक महिने मुक्कामाला होता.

Web Title: Nawazuddin Siddiqui shares pics of daughter Shora to wish her on birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.