नवाजुद्दीन सिद्दीकी पोहचला मातोश्रीवर,उद्धव ठाकरेंकडून जाणून घेतले बाळासाहेबांबाबत….

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 16:36 IST2018-03-03T11:06:36+5:302018-03-03T16:36:36+5:30

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अचानक मातोश्रीवर पोहचला.नवाजुद्दीनने मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीच्यावेळी तिथे या दोघांसह ...

Nawazuddin Siddiqui arrived from Matoshri, and learned about Balasaheb from Uddhav Thackeray .... | नवाजुद्दीन सिद्दीकी पोहचला मातोश्रीवर,उद्धव ठाकरेंकडून जाणून घेतले बाळासाहेबांबाबत….

नवाजुद्दीन सिद्दीकी पोहचला मातोश्रीवर,उद्धव ठाकरेंकडून जाणून घेतले बाळासाहेबांबाबत….

िनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अचानक मातोश्रीवर पोहचला.नवाजुद्दीनने मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीच्यावेळी तिथे या दोघांसह शिवसेना खासदार संजय राऊतसुद्धा उपस्थित होते. उद्धव आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाल्याचे समजतंय.नवाजुद्दीन सिद्दीकी हा 'ठाकरे' या आगामी सिनेमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे.या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारणं नवाजुद्दीनसाठी मोठं आव्हान असणार आहे.मात्र सिनेमाच्या टीझरमध्ये नवाजुद्दीनने दाखवलेली बाळासाहेबांची झलक सा-यांसाठी कौतुकाचा विषय ठरली होती.असं असलं तरी बाळासाहेबांची भूमिका साकारणं हे काही सोपं काम नाही हे खुद्द नवाजुद्दीनलाही माहिती आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात बाळासाहेबांचे मोठे योगदान आहे.त्यामुळेच बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी त्याने उद्धव यांच्याकडून या भेटीत बारकावे जाणून घेतले. २३ जानेवारी २०१९ रोजी 'ठाकरे' हा सिनेमा रिलीज होईल.संजय राऊत सिनेमाची निर्मिती करत असून अभिजीत पानसे दिग्दर्शन करणार आहे.

SEE PICS:नवाजुद्दीन सिद्दीकीने हुबेहुब धारण केला बाळासाहेबांचा लूक,पाहा फोटो!

Web Title: Nawazuddin Siddiqui arrived from Matoshri, and learned about Balasaheb from Uddhav Thackeray ....