​‘मोहेंजो दारो’च्या ट्रेलरची चालू आहे टिंगल-टवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 11:58 IST2016-06-22T06:28:57+5:302016-06-22T11:58:57+5:30

बहुप्रतीक्षित चित्रपट ‘मोहेंजो दारो’चा ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाला आणि हृतिकच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘लगान’ आणि ‘जोधा अकबर’ ...

Mohenjodaro Daro's trailer is going on. | ​‘मोहेंजो दारो’च्या ट्रेलरची चालू आहे टिंगल-टवाळी!

​‘मोहेंजो दारो’च्या ट्रेलरची चालू आहे टिंगल-टवाळी!

ुप्रतीक्षित चित्रपट ‘मोहेंजो दारो’चा ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाला आणि हृतिकच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

‘लगान’ आणि ‘जोधा अकबर’ यासारख्या ऐतिहासिक चित्रपटांनंतर आशुतोष गोवारीकर ‘मोहेंजो दारो’मध्ये अतिप्राचीन सभ्यता कशा प्रकारे दाखवणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.

परंतु या चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटीझन्स काही खुश दिसले नाही. सोशल मीडियावर ट्रेलरच्या लांबीपासून ते हवेत उडीमारणाऱ्या मगरीपर्यंत सर्वच गोष्टींवर अत्यंत विनोदी कॉमेंट्स करण्यात आल्या.

चित्रपटाची कथा तशीच जुनीच वाटत आहे असा लोकांचा आक्षेप आहे. ‘गरीब मुलगा, श्रीमंत मुलगी, आणि तिच्या वडिलांचा विरोध, हीरोचा लढा आणि शेवटी विजय.’ अशा प्रकारच्या कथेसाठी हजारोवर्षे जुना कालखंड निवडण्याची गरजच काय होती, असे एकाने ट्विट केले.

चित्रपटाच्या सेट आणि इफेक्ट्सबद्दलही लोक नाराज झाले. फिल्ममध्ये दाखविण्यात आलेले ‘मोहेंजो दारो’ शहर प्राचीन दिसत नाही.

पण सर्वाधिक मजेदार कॉमेंट्स आले ते ट्रेलरमध्ये दाखवलेल्या मगरीवर. ‘नदीतून मगर अशा प्रकारे उडी मारते हे केवळ बॉलीवूडमध्ये होऊ शकते! वाह रे वाह! बॉलिवूड’ प्रत्यक्षात चित्रपट पाहूनच सत्य कळेल पण त्याआधी झालेली ही ‘ट्रोलिंग’ निर्मात्यांना घाम सोडणारी आहे.

{{{{twitter_post_id####}}}}

{{{{twitter_post_id####}}}}

{{{{twitter_post_id####}}}}



 

Web Title: Mohenjodaro Daro's trailer is going on.