Masoom 2: 'मासूम'च्या सिक्वलमध्ये नसीरुद्दीन शाह-शबाना आझमींसोबत दिसणार 'हा' कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:30 IST2024-11-12T13:28:38+5:302024-11-12T13:30:09+5:30

नसीरुद्दीन शाह-शबाना आझमींच्या गाजलेल्या 'मासूम'च्या सीक्वलमध्ये कोणते कलाकार झळकणार याविषयीची माहिती समोर आलीय (masoom)

Masoom 2 starcast naseeruddin shah shabana azmi manoj vajpayye kaveri shekhar kapoor | Masoom 2: 'मासूम'च्या सिक्वलमध्ये नसीरुद्दीन शाह-शबाना आझमींसोबत दिसणार 'हा' कलाकार

Masoom 2: 'मासूम'च्या सिक्वलमध्ये नसीरुद्दीन शाह-शबाना आझमींसोबत दिसणार 'हा' कलाकार

शेखर कपूर दिग्दर्शित 'मासूम' हा सर्वांच्या हृदयाच्या जवळ असणारा सिनेमा. भावुक करणारी हळवी कहाणी 'मासूम'मध्ये पाहायला मिळाली. या सिनेमात नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, उर्मिला मातोंडकर, जुगल हंसराज यांनी भूमिका साकारल्या होत्या. 'मासूम' सिनेमातील गाणी आणि सिनेमाचं कथानक सर्वांच्या पसंतीस उतरलं. काहीच दिवसांपूर्वी 'मासूम'च्या सीक्वलची अर्थात 'मासूम २'ची घोषणा झाली. पहिल्या भागातील कलाकारांसोबतच सिक्वलमध्ये दोन नवीन कलाकारांची एन्ट्री झालीय. 

'मासूम २'मध्ये कोणते कलाकार दिसणार?

शेखर कपूर 'मासूम २' निमित्ताने पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या सिनेमात पहिल्या भागातील नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. या दोन कलाकारांसोबत लोकप्रिय अभिनेते मनोज वाजपेयी 'मासूम २'मध्ये काम करणार असल्याचं बोललं जातंय. याशिवाय शेखर कपूर यांची मुलगी कावेरी सुद्धा या सिनेमात काम करणार आहे. आता मनोज आणि कावेरीची भूमिका नेमकी काय असणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

'मासूम २' कधी रिलीज होणार?

शेखर कपूर यांनी ५५ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'मासूम २'ची घोषणा केली होती. पुढील वर्षी २०२५ ला या सिनेमाचं शूटिंगला सुरुवात होणार आहे. सिनेमाची स्टारकास्ट आता फायनल करण्यात आलीय.  'मासूम २'मध्ये कथानक कोणतं दिसणार? जुन्या चित्रपटातील कलाकार अर्थात उर्मिला मातोंडकर, जुगल हंसराज पुन्हा पाहायला मिळणार का, हे सिनेमा आल्यावरच स्पष्ट होईल. 'मासूम २' २०२६ ला रिलीज होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Masoom 2 starcast naseeruddin shah shabana azmi manoj vajpayye kaveri shekhar kapoor