माधवन म्हणतोय स्पर्धा वाढलीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 17:20 IST2016-06-22T11:50:48+5:302016-06-22T17:20:48+5:30

आर.माधवनने बॉलिवुडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पूर्वी बॉलिवुड चित्रपटांना बॉलिवुडच्याच इतर चित्रपटांसोबत स्पर्धा करावी लागत असे. ...

Madhavan says the competition has increased | माधवन म्हणतोय स्पर्धा वाढलीय

माधवन म्हणतोय स्पर्धा वाढलीय

.माधवनने बॉलिवुडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पूर्वी बॉलिवुड चित्रपटांना बॉलिवुडच्याच इतर चित्रपटांसोबत स्पर्धा करावी लागत असे. पण आता बॉलिवुडला प्रादेशिक भाषा आणि हॉलिवुड चित्रपटही जोर की टक्कर देत आहेत असे माधवनचे म्हणणे आहे. मराठी, दाक्षिणात्य या प्रादेशिक चित्रपटांच्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचसोबत हॉलिवुड चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे बॉलिवुडला प्रादेशिक आणि हॉलिवुड दोन्ही चित्रपटांसोबत स्पर्धा करावी लागत असल्याचे अभिनेता आर.माधवनचे म्हणणे आहे. 

Web Title: Madhavan says the competition has increased