कुब्रा सैत बनली दीपवीरच्या लग्नातील जबरदस्तीने थोपलेली ‘पाहुणी’, मजेदार आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 05:59 PM2020-11-01T17:59:10+5:302020-11-01T18:00:13+5:30

होय, स्वत: कुबाने अलीकडे एका मुलाखतीत याबद्दल सांगितले.

kubbra sait asked ranveer singh to invite her in his wedding | कुब्रा सैत बनली दीपवीरच्या लग्नातील जबरदस्तीने थोपलेली ‘पाहुणी’, मजेदार आहे किस्सा

कुब्रा सैत बनली दीपवीरच्या लग्नातील जबरदस्तीने थोपलेली ‘पाहुणी’, मजेदार आहे किस्सा

googlenewsNext
ठळक मुद्देकुब्राने 'सेक्रेड गेम्स'मध्ये न्यूड सीन दिला आहे. काही दिवसांपूर्वी कुबरा यावरही बोलली होती.

भारताची पहिली ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज ‘सेक्रेड गेम्स; प्रचंड गाजली. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुब्रा सैत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण सर्वाधिक चर्चा झाली ती, कुब्रा ने साकारलेल्या भूमिकेची. होय, कुब्रा ने या सीरिजमध्ये कुक्कू नावाच्या तृतीयपंथियाची भूमिका साकारली आहे. कुब्रा ने ही भूमिका इतकी प्रभावीपणे पडद्यावर साकारली की, लोकांनी तिला खरोखरचं तृतीयपंथी समजले. म्हणूनच तू तृतीयपंथी आहेस का? असा प्रश्न तिला अनेक मुलाखतीत विचारण्यात आला. हीच कुब्रा रणवीर सिंग व दीपिका पादुकोणच्या लग्नात जबरदस्तीची पाहुणी बनली होती. होय, स्वत: कुबाने अलीकडे एका मुलाखतीत याबद्दल सांगितले.

तिने सांगितले, अनेक वर्षांपूर्वी मी रणवीर भेटले होते. एक शो होस्ट करत असताना 5000 लोकांच्या गर्दीत तो मला भेटला होता. रणवीरसारखा सुपरस्टार गर्दीतला एखादा चेहरा लक्षात ठेवेल, असे मला वाटले नव्हते. मी तो मला विसरला नव्हता. 2018 मध्ये एक वेबसीरिज रिलीज झाली. त्यातील माझा अभिनय पाहून रणवीरने मला मॅसेज केला होता. क्या बॉस, आप तो बहुत दमदार हो, असा त्याचा मॅसेज होता. त्याच्या या मॅसेजवर रिप्लाय करताना मी रणवीरला त्याच्या रिसेप्शनमध्ये बोलवण्याची गळ घातली होती. हा सगळा जबरदस्तीचाच मामला होता. अशाप्रकारे मी त्याच्या रिसेप्शनची ‘जबरदस्तीची पाहुणी’ होते.
2019 मध्ये रणवीरच्या ‘गली बॉय’ या सिनेमात कुब्रा झळकली होती.

कुब्राने 'सेक्रेड गेम्स'मध्ये न्यूड सीन दिला आहे. काही दिवसांपूर्वी कुबरा यावरही बोलली होती. कुब्राचे मानाल तर ही भूमिका साकारणे सोपे नव्हते. या सीरिजमध्ये कुब्राने एक इमोशनल सीन दिला आहे. पण हा सीन साकारताना कुब्रा इतकी नर्व्हस झाली की, तिला जमता जमेना. मग काय, अनुरागने कुबराला व्हिस्की दिली आणि त्यानंतर कुठे कुब्राने ते दृश्य दिले.

Web Title: kubbra sait asked ranveer singh to invite her in his wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.