Kim Kardashianचं स्त्री २ चित्रपटाशी आहे कनेक्शन?, श्रद्धा कपूरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:49 PM2023-07-14T20:49:51+5:302023-07-14T20:50:03+5:30

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या स्त्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भागही येणार आहे.

Kim Kardashian's connection with the movie Stree 2?, Shraddha Kapoor revealed | Kim Kardashianचं स्त्री २ चित्रपटाशी आहे कनेक्शन?, श्रद्धा कपूरने केला खुलासा

Kim Kardashianचं स्त्री २ चित्रपटाशी आहे कनेक्शन?, श्रद्धा कपूरने केला खुलासा

googlenewsNext

श्रद्धा कपूरच्या स्त्री या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भागही येणार आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने हॉलिवूड स्टार किम कार्दशियनच्या मिरर सेल्फीवर एक मजेशीर कमेंट केली आहे, जी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर किमचे नवीन छायाचित्र पोस्ट करत अभिनेत्रीने लिहिले की ती एक स्त्री आहे, ती कुठेही पोहोचू शकते. खरं तर, ही ओळ श्रद्धाच्या चित्रपटातली प्रसिद्ध ओळ आहे. याच ओळीचा संदर्भ देत अभिनेत्रीने किमच्या फोटोची खिल्ली उडवली आहे.

अलीकडेच किमने तिच्या इंस्टाग्रामवर मिरर सेल्फी पोस्ट केला होता. या फोटोत एका कोपऱ्यात रहस्यमय स्त्रीची सावली लपलेली दिसत आहे. SKIMS च्या संस्थापकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, अप्रतिम. मी हा फोटो तेव्हा घेतला होता जेव्हा मी एकटी होती आणि आता जेव्हा मी माझा फोन बघतेय तेव्हा खिडकीत एका महिलेला पाहून मी घाबरले. श्रध्दा सुद्धा चकित झाली आणि ती आपल्या आगामी चित्रपट स्त्री २ चे प्रमोशन करण्यापासून मागे हटली नाही आणि तिच्या चित्रपटाचे डायलॉग टाकला.

श्रद्धाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच स्त्री २ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलचा फर्स्ट लूक सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची एक छोटी क्लिप श्रद्धाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली असून ती टॅगलाईन आहे. क्लिपमध्ये चंदेरीमधील एक शांत गल्ली एका भिंतीवर 'मिसिंग' पोस्टरसह दाखवली होती. त्यानंतर व्हिडिओमध्ये भिंतींवर 'कल आना' ऐवजी 'रक्षा करना' दाखवण्यात आले. श्रद्धाचा हा चित्रपट दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार होणार आहे. या चित्रपटात श्रद्धाशिवाय राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पुन्हा एकदा दिसणार आहेत.

Web Title: Kim Kardashian's connection with the movie Stree 2?, Shraddha Kapoor revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.