अभिषेक घेणार कपिल शर्माचा बदला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 11:39 IST2016-05-10T06:09:34+5:302016-05-10T11:39:34+5:30

 शीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात ना? पण, तुम्ही वाचताय ते अगदी खरंय... झालं असं की, ‘सरबजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मिस वर्ल्ड ...

Kapil Sharma's revenge for taking Abhishek? | अभिषेक घेणार कपिल शर्माचा बदला?

अभिषेक घेणार कपिल शर्माचा बदला?

 
ीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात ना? पण, तुम्ही वाचताय ते अगदी खरंय... झालं असं की, ‘सरबजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रॉय बच्चन कपिल शर्माचा शो ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ च्या शोवर आली होती.

तेव्हा सर्वांचे लक्ष ऐश्वर्याच्या सौंदर्यावर खिळून राहिले. पण, विशेषकरून कपिल शर्मा तिच्यावर जास्त लक्ष ठेवून होता. कपिल आणि सुनील ग्रोव्हर यांनी आॅनस्क्रीन तिच्यासोबत फ्लर्टिंग केली. याचा तिचा पती अभिषेक बच्चन याला खुप राग आला.

म्हणून आता तो ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनसाठी गेल्यावर कपिलचा बदलाच घेणार आहे म्हणे. अभिषेकला विचारण्यात आले की,‘ तु कशाप्रकारे कपिल शर्माचा बदला घेणार आहेस?’ तेव्हा तो म्हणाला,‘ कपिलचा बदला तर घेणार पण, त्यासाठी तुम्हाला शो पहावा लागणार आहे.’ 

Web Title: Kapil Sharma's revenge for taking Abhishek?