'कुछ कुछ होता है' मध्ये काजोलला हवी होती राणीची भूमिका, करण जोहरशी घातला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:47 AM2023-12-13T10:47:57+5:302023-12-13T10:53:51+5:30

राणी मुखर्जीने साकारलेली टीना ची भूमिका आधी काजोलला करायची होती.

Kajol wanted the role of Teena in Kuch Kuch Hota Hai had an argument with Karan Johar | 'कुछ कुछ होता है' मध्ये काजोलला हवी होती राणीची भूमिका, करण जोहरशी घातला होता वाद

'कुछ कुछ होता है' मध्ये काजोलला हवी होती राणीची भूमिका, करण जोहरशी घातला होता वाद

90 च्या दशकातील पिढीचा आवडीचा सिनेमा म्हणजे 'कुछ कुछ होता है' (Kuchh Kuchh Hota Hain). करण जोहरने तरुणांना मनाला भिडेल असा सिनेमा बनवला. आजही या सिनेमाची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. यातील राहुल, अंजली आणि टीना या पात्रांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पण राणी मुखर्जीने साकारलेली टीना ची भूमिका आधी काजोलला करायची होती. ती भूमिका हवी म्हणून काजोल (Kajol) तेव्हा करण जोहरशी (Karan Johar) भांडलीही होती असा खुलासा तिने नुकताच केला आहे. 

राजीव मसंद यांच्या अॅक्ट्रेस राऊंडटेबल मुलाखतीत काजोल म्हणाली, 'मला कुछ कुछ होता है मधील अंजली या भूमिकेसाठी आजही लोक ओळखतात. पण खरं सांगायचं तर मला सिनेमात राणी मुखर्जीची टीना ही भूमिका हवी होती. यासंदर्भात मी करणशी खूप वादही घातला होता. पण करण मला म्हणाला होता की तुला अंजलीची भूमिका ऑफर झाली आहे आणि तुला तीच करावी लागेल.'

ती पुढे म्हणाली,'45 मिनिटांच्या वादानंतर मी अंजलीची भूमिका करायला तयार झाले. तसंही मला हा अंदाजच नव्हता की माझी भूमिका लोकांना इतकी आवडेल. ' काजोलने अशा प्रकारे 'कुछ कुछ होता है' चा किस्सा सांगिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पुढे काजोलला या रोलसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

काजोल नुकतीच 'लस्ट स्टोरीज 2' या नेटफ्लिक्सवरील सिनेमात दिसली. याशिवाय तिने 'द ट्रायल' या वेबसिरीजमध्ये तिने वकीलाची भूमिका साकारली. सध्या काजोल ओटीटी माध्यमही गाजवत आहे. 

Web Title: Kajol wanted the role of Teena in Kuch Kuch Hota Hai had an argument with Karan Johar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.