विराट कोहलीचं ५०वं शतक! नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट, म्हणाली, "तू खरंच देवाचं बाळ आहेस"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:08 AM2023-11-16T11:08:34+5:302023-11-16T11:09:01+5:30

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने ५०वं शतक करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने खास पोस्ट शेअर केली आहे. 

ind vs nz anushka sharma praises virat kohli after his 50th centuary shared post world cup 2023 | विराट कोहलीचं ५०वं शतक! नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट, म्हणाली, "तू खरंच देवाचं बाळ आहेस"

विराट कोहलीचं ५०वं शतक! नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट, म्हणाली, "तू खरंच देवाचं बाळ आहेस"

भारताने वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. बुधवारी(१५ नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनलचा सामना रंगला. न्यूझीलंडवर मात करत भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये धडाकेबाज एन्ट्री घेतली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने ५०वं शतक करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. त्याच्या या दमदार खेळीनंतर सर्वच स्तरातून विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही विराट कोहलीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मादेखील स्टेडियममध्ये हजर होती. सामन्यादरम्यान अनुष्का विराटला चिअर करताना दिसली. विराटच्या शतकांचं अर्धशतक झाल्यानंतर अनुष्काचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने विराटला भर स्टेडियममध्ये फ्लाइंग किसही दिला.त्यानंतर अनुष्काने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत विराटचं कौतुक केलं आहे. 

"देव हा बेस्ट स्क्रिप्ट रायटर आहे. तुझं प्रेम मला मिळाल्याबद्दल, तुझ्याकडे जे आहे आणि जे मिळणार आहे त्यासाठी तुला ताकद दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. स्वत:प्रती आणि खेळाप्रती प्रामाणिक असतो. तू खरंच देवाचं बाळ आहेस," असं अनुष्काने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी बॉलिवूड वानखेडेवर अवतरलेलं पाहायला मिळालं. रणबीर कपूर, जॉन अब्राहम, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांनी हजेरी लावली होती. भारताने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर आता वर्ल्डकपसाठी भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

Web Title: ind vs nz anushka sharma praises virat kohli after his 50th centuary shared post world cup 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.