इलियाना डिक्रूज म्हणतेय, ‘बादशाहो’ माझ्यासाठी स्पेशल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 20:11 IST2017-03-05T14:41:36+5:302017-03-05T20:11:36+5:30

अजय देवगन स्टार ‘बादशाहो’ या सिनेमाची नुकतीच शूटिंग पूर्ण केलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिने पहिल्यांदाच सिनेमाविषयीच्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत.

Ileana D'Cruz says, 'Badshaho' special to me | इलियाना डिक्रूज म्हणतेय, ‘बादशाहो’ माझ्यासाठी स्पेशल

इलियाना डिक्रूज म्हणतेय, ‘बादशाहो’ माझ्यासाठी स्पेशल

य देवगन स्टार ‘बादशाहो’ या सिनेमाची नुकतीच शूटिंग पूर्ण केलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिने पहिल्यांदाच सिनेमाविषयीच्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की, हा सिनेमा माझ्यासाठी स्पेशल असून, सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही. 



इलियानाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘बादशाहो’ एक अविस्मरणीय आणि अविश्वसनीय अनुभव आहे. माझा विश्वास बसत नाही की, मी या सिनेमाची शूटिंग पूर्ण करू शकले. या सिनेमातील सर्वच स्टारकास्ट माझ्यासाठी खास असून, त्यांच्यासोबतच्या आठवणी या सदैव स्मरणात राहणार आहेत. त्यामुळे या सर्व लोकांना माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. 

यावेळी इलियानाने तिचे काही फोटोज्देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अजय देवगण आणि अन्य कलाकारांसोबत दिसत आहे. मिलन लुथ्रिया यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बादशाहो’मध्ये अजय देवगण याच्यासह इमरान हाशमी, विद्युत जामवाल, ईशा गुप्ता, संजय मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 
अजयने यापूर्वीच ‘बादशाहो’ माझ्यासाठी खास असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर या प्रोजेक्टकडून त्याला विशेष अपेक्षा असल्याचेही म्हटले होते. आता या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली असून, लवकरच सिनेमाशी संबंधित घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्या जाण्याची शक्यता आहे. या सिनेमासाठी सर्वच कलाकारांनी विशेष मेहनत घेतली असून, सिनेमाचा क्लायमॅक्स राजस्थानमध्ये शूट करण्यात आला आहे. 
">http://

अजयच्या ‘शिवाय’नंतर त्याने सर्व लक्ष ‘बादशाहो’कडे केंद्रित केले होते. शिवायच्या प्रमोशनकाळातच त्याने ‘बादशाहो’विषयीची माहिती प्रसारमाध्यमांशी शेअर केली होती. आता सिनेमा प्रेक्षकांना कितपत भावेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. शिवाय यामुळे इलियाना आणि ईशा गुप्ता या अभिनेत्रींच्या करिअरलाही कलाटणी देणारा ठरेल यात शंका नाही. 

Web Title: Ileana D'Cruz says, 'Badshaho' special to me