​मी प्रियांकाला नाही म्हणू शकत नाही- अनिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 21:09 IST2016-09-10T15:39:53+5:302016-09-10T21:09:53+5:30

अनिल कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी जरी फक्त एकाच चित्रपटात एकत्र काम केले असले तरी त्यांची मैत्री एकदम घनिष्ट ...

I can not say to Priyanka: Anil | ​मी प्रियांकाला नाही म्हणू शकत नाही- अनिल

​मी प्रियांकाला नाही म्हणू शकत नाही- अनिल

िल कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी जरी फक्त एकाच चित्रपटात एकत्र काम केले असले तरी त्यांची मैत्री एकदम घनिष्ट असल्याचे नुकतेच एका कार्यक्रमात दिसून आले.

प्रियांकाच्या होम प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’मधील एका गाण्याच्या लाँचिंगसाठी अनिलने हजेरी लावली होती. यावेळी तो म्हणाला की, ‘प्रियांका आणि तिची आई मधू हे माझ्या सर्वात जवळच्या लोकांपैकी आहेत. त्यांना मी नाही म्हणूनच शकत नाही. केवळ त्या दोघींसाठी मी येथे आलो.’

प्रियांकाच्या हॉलवूड सक्सेसबद्दल तो म्हणतो, ‘मला तिचा खूप अभिमान आहे. ‘दिल धडकने दो’मध्ये काम करताना मला जाणवले की ती केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर एका व्यक्ती म्हणूनही तेवढीच मोठी आहे. म्हणून तर भारताबरोबर देशाविदेशात लोक तिचे नाव घेत आहे. तिची अशी उंचावणारी कामगिरी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे’. अनिलची मुलगी सोनमीसुद्धा आता हॉलीवूड प्रोजेक्ट काम करणार आहे.

Web Title: I can not say to Priyanka: Anil