हेमा मालिनी अन् प्रकाश कौर आमनेसामने; नातवाच्या लग्नात पहिल्यांदाच समोरासमोर येणार धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 03:09 PM2023-06-16T15:09:30+5:302023-06-16T15:10:15+5:30

Hema malini: आजपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचं मूळ घर पाहिलेलं नाही.

hema malini and her daughter will attend karan deol drisha acharya wedding | हेमा मालिनी अन् प्रकाश कौर आमनेसामने; नातवाच्या लग्नात पहिल्यांदाच समोरासमोर येणार धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी?

हेमा मालिनी अन् प्रकाश कौर आमनेसामने; नातवाच्या लग्नात पहिल्यांदाच समोरासमोर येणार धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) याच्या घरी सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. त्यांचा नातू म्हणजे अभिनेता सनी देओलचा (sunny Deol)  लेक करण देओल (Karan Deol) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. त्यामुळे सध्या देओल कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. नुकताच करणच्या घरी मेहंदी सोहळा पार पडला. त्यामुळे आता सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकांना या लग्नसोहळ्याचे वेध लागले आहेत. यामध्येच एक मोठी माहिती समोर येत आहे. या लग्नाच्या निमित्ताने पहिल्यांदाच धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी समोरासमोर येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाशकौरसोबत केलं होतं. परंतु, त्यानंतर त्यांनी हेमा मालिनीसोबत (hema malini) दुसरा संसार थाटला. विशेष म्हणजे आजपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचं मूळ घर पाहिलेलं नाही. त्यामुळे या लग्नाच्या निमित्ताने तिचाही देओल कुटुंबात पहिल्यांदाच गृहप्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

येत्या १८ जून रोजी करण आणि त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्या(Drisha Acharya) हे लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नसोहळ्यासाठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर सनीने मोठा भाऊ या नात्याने हमा मालिनीच्या दोन्ही लेकींना आमंत्रण दिलं आहे. मात्र, या सोहळ्यामध्ये हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन लेकी इशा आणि आहाना कुठेही दिसल्या नाहीत. त्यामुळे या तिघी करणच्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहणार की नाही हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबत लग्न केल्यापासून आजपर्यंत त्या प्रकाश कौर यांच्या घराची पायरी चढलेल्या नाहीत. त्यामुळे लग्नाचं आमंत्रण असूनही त्या करणच्या लग्नाला येणार नसल्याचं म्हटलं जात आहे
 

Web Title: hema malini and her daughter will attend karan deol drisha acharya wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.